चेहऱ्यावरचा पिंपल नखाने दाबून फोडला तर काय होतं? 'ही' सवय किती घातक?

सकाळ डिजिटल टीम

पिंपल फोडण्याची सवय

चेहऱ्यावर पिंपल आला की तो लवकरात लवकर घालवण्यासाठी अनेकजण तो नखाने फोडतात किंवा दाबून त्यातील पू बाहेर काढतात.

Popping Pimples; Skincare Mistake

|

sakal 

डाग

पिंपल फोडताना त्वचेवर जास्त दाब पडल्यामुळे आतील पेशींना इजा होते आणि तिथे नंतर काळा किंवा लालसर डाग पडतो.

Popping Pimples; Skincare Mistake

|

sakal 

त्वचेवर खड्डे

त्वचेचे खोलवर नुकसान झाल्यास पिंपलच्या जागी कायमस्वरूपी खोल खड्डा किंवा मोठा व्रण पडू शकतो.

Popping Pimples; Skincare Mistake

|

sakal 

जंतू संसर्ग

पिंपल फोडताना हातावरील जंतू त्वचेवर पसरतात आणि त्यातील घाण आजूबाजूला लागल्याने संसर्गाचा धोका वाढतो.

Popping Pimples; Skincare Mistake

|

sakal 

वारंवार पिंपल्स येणे

पिंपल फोडल्यामुळे आजूबाजूच्या बंद रोमछिद्रांमध्ये तेल आणि बॅक्टेरिया साचून नवीन पिंपल्स येण्याची शक्यता बळावते.

Popping Pimples; Skincare Mistake

|

sakal 

पिंपल आल्यावर काय करावे?

चेहऱ्यावर पिंपल आल्यास त्याला वारंवार हात लावणं टाळा आणि दिवसभरातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा.

Popping Pimples; Skincare Mistake

|

sakal 

बर्फाचा वापर आणि पिंपल पॅच

सूज आणि लालसरपणा कमी करण्यासाठी स्वच्छ कापडात गुंडाळलेला बर्फ लावा किंवा त्यावर हायड्रोकोलॉइड पिंपल पॅच वापरा.

Popping Pimples; Skincare Mistake

|

sakal 

तज्ज्ञांचा सल्ला

पिंपल्स वारंवार येत असतील किंवा वेदना होत असतील, तर घरगुती उपाय करण्याऐवजी त्वचारोगतज्ज्ञांचा (डर्मेटोलॉजिस्ट) सल्ला घ्यावा.

Popping Pimples; Skincare Mistake

|

sakal 

दिवाळीनंतर ई-कचरा का वाढतो? खराब झालेल्या 'Rice Lights'चे नक्की काय होते?

E-Waste Recycling

|

sakal 

आणखी वाचा