Aarti Badade
भाजीतला कढीपत्ता काढून ठेवू नका! तो फक्त चव नाही, आरोग्याचं खजिनाच आहे.
कढीपत्ता फोडणीत वापरल्याने पदार्थाला सुवास आणि चव मिळते.
कढी, आमटी, रस्सा, चटणी सर्व पाककृतींमध्ये कढीपत्त्याचा उपयोग करा.
कढीपत्त्यात Essential Oil असते. जी स्वाद आणि औषधी गुण देतं.
कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, आयर्न, पोटॅशियम भरपूर असते.
व्हिटॅमिन C आणि E मुळे कढीपत्ता उत्कृष्ट अँटिऑक्सिडंट ठरतो.
फायबरमुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होते. पचन सुधारते. कढीपत्ता सौम्य रेचक आहे.
हृदयासाठी हितकारक कढीपत्त्यातील घटक वाईट कोलेस्टेरॉल कमी करतात. यकृतही निरोगी राहतं.