Aarti Badade
खाल्ल्यानंतर हात धुण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला फिंगर बाउल दिला जातो. यामध्ये कोमट पाणी व एक लिंबाचा तुकडा असतो.
छोट्या बाउलमध्ये गरम पाणी व लिंबाचा तुकडा देऊन त्यात फक्त बोटं बुडवून स्वच्छ केली जातात.
लिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे हातांवरचे जंतू मरतात व खाद्यपदार्थांचा वासही निघून जातो.
फिंगर बाउलमधील लिंबू पिळणे चुकीचे मानले जाते. फक्त तेलकट बोटांसाठी हलके चोळणे पुरेसे असते.
फिंगर बाउल संस्कृती अमेरिकेत पहिल्या महायुद्धाच्या काळात सुरू झाली, जेव्हा विविध देशांचे प्रतिनिधी महागड्या हॉटेल्समध्ये एकत्र येत असत.
ग्राहकांच्या मागणीनुसार आणि सवयीमुळे आजही अनेक रेस्टॉरंट्समध्ये फिंगर बाउल दिला जातो.
पूर्ण हात न धुता फक्त बोटं बुडवावीत. लिंबू पिळू नये.
जर बोटं खूप तेलकट असतील, तर फक्त त्या बोटांवर लिंबाचा तुकडा हलका चोळा.
फिंगर बाउलचा योग्य वापर तुमच्या शिष्टाचार आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतो.