बाळकृष्ण मधाळे
लालसर तपकिरी केस, चेहऱ्यावरील पांढऱ्या खुणा आणि झुबकेदार शेपटी हे रेड पांडाचे वैशिष्ट्य आहे. हिमालयीन प्रदेशातील जंगलांत आढळणारा हा प्राणी प्रामुख्याने बांबू खातो. जंगलतोड आणि अधिवासाचा ऱ्हास यांमुळे त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
9 rare animals found in Asia
esakal
आग्नेय आशियातील जंगलांत आढळणाऱ्या बिंटुरॉन्गला (Binturong) लांब शेपटी आणि दाट काळसर केस असतात. हा निशाचर प्राणी झाडांवर वावरण्यात कुशल आहे. फळे, विशेषतः अंजीर हे त्याचे प्रमुख खाद्य आहे.
9 rare animals found in Asia
esakal
मोठे गोल डोळे आणि संथ हालचाली यांमुळे स्लो लोरिस (Slow Loris) सहज ओळखता येतो. दक्षिण व आग्नेय आशियातील जंगलांत आढळणारा हा निशाचर प्राणी फळे, कीटक खातो आणि झाडांचा रस पितो.
9 rare animals found in Asia
esakal
डुगोंग हा उथळ समुद्रातील गवताळ भागांत राहणारा सागरी सस्तन प्राणी (Dugong) आहे. सागरी गवत हे त्याचे प्रमुख खाद्य असून, सागरी परिसंस्थेचा समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. भारतातील मन्नारचे आखात आणि अंदमान-निकोबार परिसरात तो आढळतो.
9 rare animals found in Asia
esakal
काळ्या-पांढऱ्या रंगाचे शरीर हे मलयन टॅपिरचे (Malayan Tapir) खास वैशिष्ट्य आहे. मलेशिया आणि थायलंडच्या काही भागांतील जंगलांत तो आढळतो. छोट्या सोंडेसारखी नाकाची रचना पाने आणि फळे खाण्यास मदत करते.
9 rare animals found in Asia
esakal
शरीरावर कठीण खवले असलेला पँगोलिन धोका जाणवल्यास स्वतःला गोलाकार गुंडाळतो. मुंग्या आणि वाळवी हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. भारतासह आशियातील अनेक देशांत त्याच्या विविध प्रजाती आढळतात.
9 rare animals found in Asia
esakal
धातूसारखा चमकणारा निळा रंग हे गूटी सफायर टॅरंटुलाचे (Gooty Sapphire Tarantula) आकर्षक वैशिष्ट्य आहे. हा दुर्मिळ कोळी भारतातील आंध्र प्रदेशातील मर्यादित वनक्षेत्रात आढळतो.
9 rare animals found in Asia
esakal
अंगावरील ढगांसारख्या काळसर नक्षींमुळे या शिकारी प्राण्याला क्लाउडेड लेपर्ड (Clouded Leopard) म्हणतात. दक्षिण व आग्नेय आशियातील जंगलांत आढळणारा हा प्राणी झाडांवर चढण्यात कुशल आहे. पक्षी आणि लहान सस्तन प्राणी हे त्याचे खाद्य आहे.
9 rare animals found in Asia
esakal
सिंहासारखे केस आणि शेपटीच्या टोकावरील झुबका हे या माकडाचं वैशिष्ट्य आहे. भारतातील पश्चिम घाटाच्या सदाहरित जंगलांत हा प्राणी आढळतो. फळे, बिया आणि कीटक हे त्याचे प्रमुख खाद्य आहे.
9 rare animals found in Asia
esakal
Monkey Adulthood Age
esakal