जगातला सर्वात संथ प्राणी कोण? उत्तर थक्क करणारे आहे!

सकाळ डिजिटल टीम

संथ प्राणि

जगातील सर्वात संथ प्राणि कोणता आहे आणि त्याचे वैशिष्ट्ये काय आहेत जाणून घ्या.

slowest animal

|

sakal 

थ्री-टो स्लोथ

जगातील सर्वात संथ चालणारा सस्तन प्राणी म्हणून थ्री-टो स्लोथ ओळखला जातो. हे प्राणि प्रामुख्याने मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या घनदाट जंगलात अढळतात.

slowest animal

|

sakal 

कमी वेग

स्लोथचा जमिनीवरील वेग ताशी फक्त ०.२४ किलोमीटर (सुमारे १५ फूट प्रति मिनिट) असतो. इतक्या कमी वेगामुळे तो जगातील सर्वात संथ सस्तन प्राणी ठरतो.

slowest animal

|

sakal 

झाडांवरील जीवन

स्लोथ आपले संपूर्ण आयुष्य झाडांवरच घालवतात. ते फांद्यांना उलटे लटकून झोपतात, खातात आणि अगदी पिलांना जन्मही झाडावरच देतात.

slowest animal

|

sakal 

झोपेचा कालावधी

हे प्राणी दिवसातील साधारण १५ ते २० तास फक्त झोपण्यात घालवतात, म्हणून त्यांना जगातील सर्वात आळशी प्राणी देखील म्हटले जाते.

slowest animal

|

sakal

पाचनशक्ती

स्लोथची पचनशक्ती खूपच मंद असते. त्यांनी खाल्लेले एक पान पचवण्यासाठी त्यांच्या शरीराला कधीकधी ३० दिवसांपर्यंत वेळ लागू शकतो.

slowest animal

|

sakal 

अन्न

हे प्रामुख्याने झाडांची पाने, डहाळ्या आणि कळ्या खातात. त्यांच्या अन्नातून त्यांना खूप कमी ऊर्जा मिळते, हेच त्यांच्या संथ हालचालीचे मुख्य कारण आहे.

slowest animal

|

sakal 

शारीरिक रचना

त्यांच्या हातापायांना लांब आणि वक्र नखे असतात, ज्यामुळे त्यांना झाडाच्या फांद्या घट्ट पकडून ठेवता येतात. जमिनीवर चालणे त्यांना कठीण जाते, कारण त्यांचे स्नायू जमिनीवर चालण्यासाठी बनलेले नाहीत.

slowest animal

|

sakal 

उत्कृष्ट पोहणारे

जरी ते जमिनीवर हळू चालत असले तरी, स्लोथ पाण्यात उत्तमरीत्या पोहू शकतात. पाण्यात त्यांचा वेग जमिनीच्या तुलनेत तीन पटीने जास्त असू शकतो.

slowest animal

|

sakal 

ऊर्जा बचत

स्लोथचा मेटाबॉलिक रेट (Metabolic rate) खूप कमी असतो. अत्यंत कमी ऊर्जेवर जिवंत राहण्यासाठी निसर्गाने त्यांना ही संथ जीवनशैली दिली आहे.

slowest animal

|

sakal 

U19 World Cup ट्रॉफीचं फोटो शूटसाठी चक्क चित्त्यासोबत; एकदा पाहाच

U19 World Cup trophy photoshoot with cheetah

|

Sakal

येथे क्लिक करा