Pranali Kodre
लंडनमध्ये सध्या विंबल्डन २०२५ ही टेनिस स्पर्धा सुरू आहे. ही प्रतिष्ठीत आणि सर्वात जुनी टेनिस स्पर्धा आहे.
लंडनमधील ऑल इंग्लंड क्लब येथे १८७७ सालापासून विंबल्डन आयोजित केली जाते. दरवर्षी होणाऱ्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा आहे.
विंबलडन ही स्पर्धा साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपते.
या स्पर्धेत महत्त्वाच्या स्पर्धा सेंटर कोर्टला होतात. सेंटर कोर्टमधील सामने पाहण्यासाठी दरवर्षी अनेक सेलिब्रेटी उपस्थित असतात.
विंबल्डनमधील इतर कोर्ट्सपेक्षा सेंटर कोर्टचे तिकीटं थोडी महाग असतात. तसेच स्पर्धेतील फेरीनुसार त्यांची किंमत वाढत जाते.
Row ZA-ZF: जवळपास ७,५३० रुपये (साधारण मागच्या रांगा)
Row U-Z: जवळपास १०,०४० रुपये (मधल्या रांगा)
Row A-T (Premium): जवळपास १०,५४२ रुपये (समोरच्या सीट्स)
याशिवाय सेमीफायनल आणि फायनलपर्यंत तिकिटांचे दर ३० ते ३५ हजारांपर्यंत पोहचतात.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ज्या सेलिब्रेटिंना रॉयल बॉक्समध्ये बसण्यासाठी AELTC च्या अध्यक्षांकडून आमंत्रण दिले जाते, त्यांना तिकीटे खरेदी करण्याची गरज नसते.
रॉयल बॉक्स ही विंबल्डनमधील सर्वात प्रतिष्ठीत जागा मानली जाते, तिथे अनेक सेलिब्रेटी उपस्थित असल्याचे दिसतात.
याच रॉयल बॉक्समध्ये ठिकाणी यंदाच्या विंबल्डनमध्ये रॉजर फेडरर, जो रुट, रिषभ पंत, विराट कोहली, जेम्स अँडरसन असे दिग्गज बसलेले दिसले होते.