Shubham Banubakode
बाबर, अकबर, जहांगीर आणि शहाजहानसह अनेक सम्राट नियमितपणे दारू, अफू आणि तंबाखू सेवन करायचे.
मुघल सम्राटांमध्ये सर्वात जास्त दारू पिणारा कुणी मुघल बादशहा असेल तर तो जहांगीर होता. तो एका वेळी 20 ग्लास वाइन प्यायल्याच्या या नोंदी आहेत.
मुघल दरबारात दारू पिणे ही सामान्य बाब होती. राजकीय आणि सामाजिक समारंभांमध्ये दारूचा वापर मनोरंजनाचा भाग मानला जायचा.
मुघलांच्या काळात बहुतांश दारू इराणमधून आयात केली जायची. इराण त्या काळी वाइनसाठी प्रसिद्ध होते.
भारतात, विशेषतः उत्तर भारतात, द्राक्षांच्या फळांपासून दारू बनवली जायची. येथील हवामान द्राक्षशेतीसाठी योग्य होते.
मुघल काळात प्रगत तंत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे द्राक्षांचे किण्वन करून साध्या पद्धतीने दारू तयार केली जायची.
पर्शियामधून आयात होणारी ‘शेरी’ वाइन मुघल दरबारात खूप लोकप्रिय होती. ही वाइन जगभरात उत्कृष्ट मानली जायची.
परदेशी पाहुण्यांसाठी पोर्तुगीज आणि डच व्यापाऱ्यांमार्फत युरोपमधून दारू आयात केली जायची. ही दारू शाही समारंभात ठेवली जायची.
इराणसह मध्य आशियाई देश, जसे की पर्शिया दारूच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र होते.