हिवाळ्यात घ्या ओल्या हरभऱ्याची चव! 'हे' जबरदस्त फायदे वाचून व्हाल थक्क

सकाळ डिजिटल टीम

ओला हरभरा

हिवाळ्यात ओला हरभरा का खावा यामुळे आरोग्यास कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.

Green Gram

|

sakal 

प्रथिनांचा खजिना

ओल्या हरभऱ्यामध्ये भरपूर प्रथिने (Protein) असतात, जे थंडीत शरीरातील पेशींची दुरुस्ती आणि वाढीसाठी मदत करतात, तसेच स्नायूंना (Muscles) मजबूत बनवतात.

Green Gram

|

sakal 

ऊर्जेचा स्रोत

यात नैसर्गिकरित्या कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) असल्यामुळे, तो हिवाळ्यात शरीराला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतो आणि थंडीत शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतो.

Green Gram

|

sakal 

निरोगी पचनसंस्था

ओला हरभरा हा फायबरचा (Fiber) उत्कृष्ट स्रोत आहे. हे फायबर पचनक्रिया सुधारते, आतड्यांचे आरोग्य जपते आणि बद्धकोष्ठता दूर ठेवण्यास मदत करते.

Green Gram

|

sakal

रक्ताची कमतरता

यामध्ये लोह (Iron) आणि फोलेट मोठ्या प्रमाणात असते. हे घटक रक्त तयार करण्यास मदत करतात, हिमोग्लोबिनची पातळी सुधारतात आणि ॲनिमियाचा धोका कमी करण्यास मदत करतात.

Green Gram

|

sakal 

कोलेस्टेरॉल

हरभऱ्यातील फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी नियंत्रित ठेवतात, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होण्यास मदत मिळते.

Green Gram

|

sakal 

हाडे आणि स्नायू

यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे (Minerals) असतात, जी हाडे मजबूत ठेवण्यास आणि स्नायूंचे कार्य सुधारण्यास मदत करतात.

Green Gram

|

sakal 

त्वचेला चमक

व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे ते त्वचेला चमक आणतात आणि केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातता.

Green Gram

|

sakal 

वजन नियंत्रण

प्रोटीन आणि फायबर जास्त असल्याने ओला हरभरा खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Green Gram

|

sakal 

नाशपती फळ खाण्याचे आहेत अद्भूत फायदे

येथे क्लिक करा