हिवाळ्यात शरीराला जास्त कशाची गरज असते? अन्न की पाणी?

Aarti Badade

हिवाळ्यात शरीराला काय हवे?

थंडीच्या दिवसांत शरीर उबदार आणि निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक अन्नासोबत पुरेसे पाणी पिणेही महत्त्वाचे असते.

winter food-or water body need

| sakal

हिवाळ्यात भूक का वाढते?

शरीराचे तापमान टिकवण्यासाठी ऊर्जा खर्च होत असल्याने काही लोकांना थंडीच्या दिवसांत नेहमीपेक्षा जास्त भूक लागू शकते.

winter food-or water body need

| esakal

आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?

बाजरी, तीळ, गूळ, सुका मेवा, डाळी, तूप आणि हंगामी भाज्यांमधून शरीराला ऊर्जा व आवश्यक पोषक घटक मिळतात.

winter food-or water body need

|

esakal

थंडीत तहान कमी का लागते?

थंड हवामानात घाम कमी येत असल्याने तहानेची जाणीव कमी होऊ शकते; मात्र त्यामुळे शरीराची पाण्याची गरज कमी होत नाही.

winter food-or water body need

| Sakal

पाणी कमी प्यायल्यास काय होते?

पुरेसे पाणी न प्यायल्यास शरीरात निर्जलीकरण होऊ शकते आणि थकवा, त्वचेचा कोरडेपणा व बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो.

winter food-or water body need

| esakal

हिवाळ्यात किती पाणी प्यावे?

दिवसभर नियमित अंतराने पाणी प्या; सूप आणि कोमट पाणीही घेऊ शकता, मात्र पाण्याचे प्रमाण वय, हालचाल आणि आरोग्यानुसार बदलते.

winter food-or water body need

|

Sakal

अन्न आणि पाणी दोन्ही महत्त्वाचे!

हिवाळ्यात पौष्टिक आहारातून ऊर्जा मिळवा आणि तहान कमी लागली तरी पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवा.

winter food-or water body need

|

sakal 

पुण्यापासून लोहगड किल्ला किती लांब आहे?

lohagad

|

Sakal

येथे क्लिक करा