सकाळ डिजिटल टीम
हिवाळ्यात शरीरातील उष्णता कमी झाल्यास अनेक आजार होवू शकतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात अळीवचा समावेश करणे किती महत्त्वाचे आहे जाणून घ्या.
Aliv seeds
sakal
अळीव हे लोहाचे (Iron) उत्कृष्ट स्रोत आहेत. थंडीमध्ये अनेक महिलांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी होते. अळीव नियमित खाल्ल्यास रक्ताची कमतरता भरून काढण्यास आणि ॲनिमियाचा धोका कमी करण्यास मदत होते.
Aliv seeds
sakal
या बियांमध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin C), व्हिटॅमिन-ए (Vitamin A) आणि ई मोठ्या प्रमाणात असल्याने, ते शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळे सर्दी, खोकला आणि फ्लूपासून बचाव होण्यास मदत होते.
Aliv seeds
sakal
अळीव हे कॅल्शियमचा चांगला स्रोत आहेत. हिवाळ्यात अनेकदा सांधेदुखी आणि कंबरदुखी वाढते. अळीव खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखी कमी होण्यास मदत मिळते.
Aliv seeds
sakal
या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. थंडीमध्ये पचनक्रिया मंदावते. अळीव खाल्ल्याने पोट साफ राहते, बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
Aliv seeds
sakal
अळीवामध्ये असलेले घटक दम्यासारख्या श्वसनविकारांवर (Respiratory Issues) आणि खोकल्यावर आराम देतात. थंडीमध्ये होणारे छातीतील कफ (Congestion) कमी करण्यासाठी ते उपयुक्त मानले जातात.
Aliv seeds
sakal
यातील अँटिऑक्सिडंट्स आणि प्रथिने केसगळती (Hair Fall) कमी करतात आणि केसांची वाढ चांगली करतात. तसेच त्वचेला पोषण देऊन कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात.
Aliv seeds
sakal
उच्च फायबर आणि प्रथिने असल्यामुळे अळीव खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे वजन नियंत्रणात (Weight Control) ठेवण्यास मदत होते.
Aliv seeds
sakal
अळीवाचा गुणधर्म उष्ण असतो. हिवाळ्याच्या काळात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीरात उब (Warmth) निर्माण करण्यासाठी अळीवाचे लाडू किंवा खीर खाणे हा पारंपरिक आणि उत्तम उपाय मानला जातो.
Aliv seeds
sakal
Tulsi Health
sakal