सकाळ डिजिटल टीम
हिवाळ्यात आइस्क्रीमचे सेवन आरोग्यासाठी योग्य आहे की अयोग्य? तज्ञ काय सांगतात जाणून घ्या.
Ice Cream
sakal
सर्दी किंवा खोकला हा विषाणूमुळे (Virus) होतो, थंड पदार्थामुळे नाही. आइस्क्रीममुळे थेट संक्रमण होत नाही.
Ice Cream
sakal
जास्त थंड आइस्क्रीम खाल्ल्यास घशातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि तात्पुरती खवखव किंवा वेदना होऊ शकतात.
Ice Cream
sakal
खूप थंड पदार्थ खाल्ल्यास, शरीराला तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. यामुळे रोगप्रतिकारशक्तीवर तात्पुरता ताण येऊ शकतो.
Ice Cream
sakal
ज्यांना सायनसचा किंवा जास्त कफ होण्याची समस्या आहे, त्यांना थंड पदार्थांमुळे त्रास वाढू शकतो.
Ice Cream
sakal
काही लोकांना थंड पदार्थांमुळे पचनक्रिया मंदावल्यासारखी वाटते किंवा पोटात गॅस होऊ शकतो.
Ice Cream
sakal
आइस्क्रीममध्ये साखर आणि फॅटचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे ते कोणत्याही ऋतूत मर्यादित प्रमाणातच खावे.
Ice Cream
sakal
थंडीत रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी आइस्क्रीम खाणे टाळा. दुपारच्या वेळी किंवा घरामध्ये तापमान जास्त असताना खाणे शरीरासाठी योग्य ठरू शकते.
Ice Cream
sakal
जर तुम्हाला घसा दुखत नसेल आणि आरोग्य चांगले असेल, तर आइस्क्रीम थोडे वितळल्यानंतर (कमी थंड) खाणे अधिक सुरक्षित ठरू शकते.
Ice Cream
sakal
हिवाळ्यात रताळं खाण्याचे 5 भन्नाट फायदे, जाणून घ्या!
Sakal