Aarti Badade
थंडीच्या दिवसांत रताळे (Sweet Potato) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. ते शरीराला उबदार ठेवते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
Sakal
रताळे हे व्हिटॅमिन ए, बी, सी, फायबर, आयर्न, पोटॅशियम आणि बीटा-कॅरोटीन यांसारख्या पोषक तत्वांचा खजिना आहे.
Sakal
रताळ्यातील व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवतात, ज्यामुळे हिवाळ्यातील आजारांपासून बचाव होतो.
sakal
थंडीच्या दिवसांत रताळे खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते आणि ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे दिवसभर उत्साही आणि उबदार वाटते.
Sakal
रताळ्यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेसारख्या (Constipation) समस्या दूर करते.
Sakal
रताळे खाल्ल्याने त्वचेलाही फायदा होतो. ते त्वचेचे आरोग्य सुधारते आणि थंडीत त्वचा निरोगी आणि मऊ ठेवण्यास मदत करते.
Sakal
रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे मधुमेहींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि शक्यतो उकडलेल्या स्वरूपातच रताळे खाण्याची काळजी घ्यावी.
Sakal
Sakal