Anushka Tapshalkar
हिवाळ्यात थंड हवामानामुळे आपण आजारी पडण्याची शकता असते. हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी सकाळी उपाशीपोटी ‘या’ बिया खा.
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ भरपूर प्रमाणात मिळते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
सूर्यफुलाच्या बिया व्हिटॅमिन ईचा खजिना आहेत. अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध या बिया हृदयासाठी चांगल्या असतात.
तीळ उष्णता आणि पोषणाचा उत्तम स्रोत आहेत. हाडांसाठी गरजेचे कॅल्शियम देखील यात भरपूर प्रमाणात असते.
फायबर्सने समृद्ध चिआ बिया पचन सुधारण्यास आणि ऊर्जा वाढवण्यास मदत करतात. सकाळी नाश्त्याला दह्यात किंवा स्मूदीमध्ये घालून या बियांचे सेवन करता येऊ शकते.
भोपळ्याच्या बिया झिंक आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहेत. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यास सर्दी कमी होण्यास मदत होऊ शकते.
हिवाळ्यात या बियांचे सकाळी उपाशीपोटी सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच पण शरीराला उष्णता आणि ऊर्जा सुद्धा मिळते व पचन सुधारून हिवाळ्यातील अपचनाचा त्रास कमी होतो.