Aarti Badade
थंडीचा जोर वाढत आहे, अशा वेळी तुमच्या कुटुंबाचा भाग असलेल्या कुत्रा किंवा मांजरीच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
Health Tips for Dogs and Cats.
sakal
हिवाळ्यात प्राण्यांचे केस (Fur) त्यांच्यासाठी नैसर्गिक कवच असते, त्यामुळे या दिवसांत केसांची कटिंग करणे टाळा. त्यांना नेहमी कोमट पाण्याने अंघोळ घाला आणि आंघोळीनंतर लगेच बाहेर थंड हवेत नेऊ नका.
Health Tips for Dogs and Cats.
sakal
पहाटेच्या वेळी किंवा रात्री उशिरा खूप थंडी असते, त्यामुळे पाळीव प्राण्यांना यावेळी बाहेर फिरवू नका. जेव्हा दिवसा कडक ऊन असेल, तेव्हाच त्यांना फिरायला नेणे आरोग्यासाठी उत्तम ठरेल.
Health Tips for Dogs and Cats.
sakal
बाहेर फिरताना आपल्या लाडक्या प्राण्यांना हलके पण उबदार कपडे (Sweaters/Jackets) घाला. यामुळे त्यांचे थंडीपासून संरक्षण होईल आणि त्यांना आजारपणाचा धोका कमी होईल.
Health Tips for Dogs and Cats.
sakal
थंडीत प्राणी कमी पाणी पितात. मात्र, त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी त्यांना वेळोवेळी पाणी द्या. फ्रिजमधील थंड पाण्याऐवजी कोमट पाणी देणे अधिक फायदेशीर ठरते.
Health Tips for Dogs and Cats.
sakal
माणसांप्रमाणेच प्राण्यांची त्वचाही थंडीत कोरडी पडते. त्यांच्या त्वचेला आणि केसांना मऊ ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर किंवा खोबरेल तेल लावा. यामुळे त्यांना खाज किंवा त्वचाविकार होणार नाहीत.
Health Tips for Dogs and Cats.
sakal
पाळीव प्राण्यांचे लसीकरण (Vaccination) वेळेवर पूर्ण करा. जर तुमचा प्राणी सुस्त वाटत असेल किंवा त्याला काही त्रास जाणवत असेल, तर विलंब न करता पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Health Tips for Dogs and Cats.
sakal
Honey with warm water benefits
Sakal