Weight Loss : हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी खा "या" 6 भाज्या, झटपट होईल कमी वजन

Monika Shinde

राजगिरा भाजी

राजगिरा भाजी कमी कॅलोरी आणि जास्त फायबर्स असते, त्यामुळे ती वजन कमी करण्यासाठी चांगले आहे. आणि शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते. आठवड्यातून ३ वेळा नियमित खाल्याने झटपट वजन कमी होते.

लाल भोपळा

लाल भोपळ्यात कॅलोरीज कमी असतात, त्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारात त्याचा समावेश केला जातो. यात  व्हिटॅमिन A, C, आणि K तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि आयर्न यांसारखे मिनरल्स असते. यामुळे झटपट वजन कमी होते.

पालक

पालक मध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे हिवाळ्यात पालक खाल्याने शरीराला आवश्यक पोषक मिळतं आणि पचन प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे वजन झटपट कमी होण्यात मदत मिळते.

कोबी

कोबीमध्ये कमी कॅलोरी, पण भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. हिवाळ्यात याचा वापर भाजी किंवा सूप मध्ये देखील  शकता आणि शरीरातील अतिरिक्त चरबी लवकर कमी करा.

ब्रोकली

ब्रोकली मध्ये व्हिटॅमिन C, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी उत्कृष्ट आहे.

मुळा

मुळा हा शरीरातील चरबी बर्न करण्यास मदत करते. हिवाळ्यात मुळ्याची कोशिंबीर, भाजी किंवा सूपमध्ये वापर देखील करू शकता, आणि वजन झटपट कमी होते.

Winter Soup: हिवाळ्यात घरच्या घरी बनवा गरमागरम सूप, वजन ठेवा नियंत्रित

आणखी वाचा