Monika Shinde
तुळशी, आयुर्वेदातील एक महत्त्वाची औषधी वनस्पती, तिच्या औषधी गुणधर्मांमुळे ओळखली जाते. रोज एकदा तुळशीचा चहा पिणे फायदेशीर आहे.
तुळशीतील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि सर्दी-पडसं, ताप यापासून बचाव करतात.
तुळशीचा चहा तणाव कमी करून मन शांत ठेवतो. त्यातील अॅडॉप्टोजेनिक गुणधर्म तणाव आणि चिंता दूर करण्यास मदत करतात.
तुळशीच्या चहामुळे पचन सुधारते, पोटाचे विकार कमी होतात, आणि अपचन व गॅससारख्या समस्या दूर होतात.
तुळशीचा चहा सर्दी-खोकला, घशातील खवखव आणि श्वसनाच्या समस्यांवर आराम देतो.
तुळशीतील अँटीऑक्सिडंट्स कोलेस्टेरॉल कमी करतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
तुळशीतील गुणधर्म त्वचेला चमकदार ठेवतात आणि त्वचेवरील मुरुमांपासून बचाव करतात.
तुळशीचा चहा मेटाबॉलिझम सुधारतो, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
तुळशी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते, ज्यामुळे मधुमेह रुग्णांना फायदा होतो.
तुळशीचा चहा डोकेदुखी आणि मायग्रेनसाठी आरामदायक ठरतो.
Winter Health Tips : हिवाळ्यातील आरोग्य टिकवण्यासाठी "या" पदार्थाचा आहारात समाविष्ट करा