Aarti Badade
थंडी वाढली की शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्तदाब वाढून मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह विस्कळीत होतो, जो स्ट्रोकचे मुख्य कारण ठरतो.
Brain Stroke in Winter |
Sakal
हिवाळ्यात शारीरिक हालचाल कमी होते आणि लोक पाणी कमी पितात. यामुळे रक्त घट्ट होऊन रक्ताच्या गाठी (Blood Clots) तयार होतात, ज्यामुळे 'इस्केमिक स्ट्रोक'चा धोका वाढतो.
Brain Stroke in Winter |
Sakal
चेहरा एका बाजूला वाकडा होणे, हात-पायांत अचानक कमजोरी येणे, बोलताना जीभ जड होणे किंवा दृष्टी धूसर होणे ही स्ट्रोकची प्राथमिक लक्षणे आहेत.
Brain Stroke in Winter |
Sakal
स्ट्रोकची लक्षणे दिसू लागल्यास पहिले ४ ते ४.५ तास अत्यंत महत्त्वाचे असतात. या 'सुवर्ण तासात' उपचार मिळाल्यास कायमचे अपंगत्व टाळता येते आणि जीव वाचू शकतो.
Brain Stroke in Winter |
Sakal
ज्यांना आधीच उच्च रक्तदाब किंवा मधुमेह आहे, त्यांनी हिवाळ्यात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीमुळे या दोन्ही गोष्टी अनियंत्रित होण्याची दाट शक्यता असते.
Brain Stroke in Winter |
Sakal
तहान लागत नसली तरी हिवाळ्यात भरपूर पाणी प्या. पाणी कमी प्यायल्याने रक्त अधिक घट्ट होते, जे स्ट्रोकसाठी कारणीभूत ठरू शकते.
Brain Stroke in Winter |
Sakal
धूम्रपान, मद्यसेवन आणि अति तेलकट आहार हिवाळ्यात स्ट्रोकचा धोका दुप्पट करतात. तसेच थंडीत फ्लू किंवा संसर्गामुळे शरीरातील दाह वाढूनही धोका निर्माण होऊ शकतो.
Brain Stroke in Winter |
Sakal
Gym vs Yoga
Sakal