सकाळ डिजिटल टीम
Harbhara Bhaji : कडाक्याच्या थंडीमुळे हरभऱ्याचे पीक उत्तम वाढत आहे. भाजीसाठी वापरली जाणारी हरभऱ्याची कोवळी पाने बाजारात विक्रीसाठी येत असून, तज्ञ्जांच्या मते थंडीत हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.
Harbhara Bhaji Benefits
esakal
थंडीच्या दिवसांत हरभऱ्याच्या पानांची भाजी खाणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. या भाजीत कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, आयर्न, झिंक, मँगनीज आणि कॉपर यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
Harbhara Bhaji Benefits
esakal
या भाजीमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, फायबर, आयर्न, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारखी आवश्यक पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
Harbhara Bhaji Benefits
esakal
हरभऱ्याच्या भाजीत असलेले पोषक घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
Harbhara Bhaji Benefits
esakal
हरभऱ्याच्या भाजीत पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि कोलेस्टेरॉल कमी होते, ज्यामुळे हृदयाचे आजार टाळता येतात.
Harbhara Bhaji Benefits
esakal
या भाजीतील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
Harbhara Bhaji Benefits
esakal
कॉपर आणि झिंक यांसारख्या खनिजांमुळे त्वचेची चमक वाढते. त्वचेच्या आरोग्यासाठी ही भाजी फायदेशीर आहे.
Harbhara Bhaji Benefits
esakal
हरभऱ्याच्या भाजीत लोह असल्याने रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत होते.
Harbhara Bhaji Benefits
हिवाळ्यात शरीराती उष्णता योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिरव्या भाज्यांप्रमाणेच हरभऱ्याची भाजीही खूप उपयुक्त ठरते.
Harbhara Bhaji Benefits
esakal
Spinach Side Effects
esakal