हिवाळ्यातील 'सुपरफूड'! अशक्तपणासह हे एक कंदमूळ खाण्याचे आहेत अनेक फायदे

Aarti Badade

हिवाळ्यातील ऊब

सुरण कंद (Suran Kand) हा उष्ण आणि पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण असून, हिवाळ्यात शरीराला ऊब देण्यासाठी आहारात घेतला जातो.

Sakal

रोगप्रतिकारशक्तीचा बूस्टर

सुरणामध्ये व्हिटामिन C आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक असल्याने, तो रोगप्रतिकारशक्ती वाढवून सर्दी-खोकल्यापासून बचाव करतो.

Sakal

पचन आणि फायबर

सुरणातील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठता, गॅस तसेच अपचनाच्या समस्यांवर फायदा होतो.

Sakal

सांधेदुखीवर आराम

सुरण सांधेदुखी, स्नायू ताण आणि सूज यावर आराम देतो, ज्यामुळे हिवाळ्यात वाढणाऱ्या त्रासावर तो उपयुक्त ठरतो.

Sakal

अशक्तपणा आणि वजन नियंत्रण

सुरणात आयर्न असल्याने रक्ताची पातळी वाढते आणि थकवा-अशक्तपणा दूर होतो; तसेच फायबरमुळे वजन नियंत्रणात राहते.

Sakal

त्वचा आणि केसांसाठी

सुरणातील व्हिटामिन A आणि C मुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो, ओलावा मिळतो; तसेच केस गळती आणि कोंड्यावरही फायदा होतो.

Sakal

खाताना घ्या काळजी

कच्चे सुरण खाऊ नये; तसेच मूळव्याध, पित्त आणि घसा खवखवण्याचा त्रास असणाऱ्यांनी लिंबू किंवा चिंच घालूनच मर्यादित प्रमाणात सेवन करावे.

Sakal

शरीराला 'जीवनसत्त्वांचे टॉनिक'! सकाळच्या वेळी ही फळे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Sakal

येथे क्लिक करा