Sudesh
साधारणपणे 17व्या वर्षानंतर अक्कलदाढ बाहेर येण्याची प्रकिया सुरू होते. यावेळी ही दाढ प्रचंड दुखते.
या प्रक्रियेत केवळ दाढच नाही, तर शेजारचे दात आणि हिरड्यांचा बराचसा भागही दुखत असतो. या वेदना सहन करण्यापलीकडे असतात.
दाढदुखीमुळे सूज येते, त्यामुळे याठिकाणी सुमारे 15 मिनिटं बर्फ लावल्याने फायदा होतो.
यासोबतच, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने देखील दाढदुखीपासून काही काळ आराम मिळतो.
तुम्हाला मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायच्या नसतील, तर काही वेळ कोमट पाणी तोंडात ठेवल्याने देखील आराम मिळू शकतो.
लवंग थेट दाढेवर ठेवा किंवा लवंग तेल कापसात भिजवून काही वेळ दाढेवर ठेवा. तुम्हाला आराम मिळेल
सूज कमी करण्यासाठी लसणाच्या पाकळ्या ठेचून दाढेवर ठेवता येतात. त्याचप्रमाणे, आले देखील सूज कमी करण्यास मदत करते.
या घरगुती उपायांनंतर देखील दाढदुखी कमी होत नसेल, किंवा त्रास वाढतच जात असेल तर तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.