महिलांनो! रोज फक्त १० मिनिटं करा 'हे' व्यायाम आणि वाढवा ताकद, स्टॅमिना व आत्मविश्वास

Anushka Tapshalkar

Pelvic Floor म्हणजे काय?

पेल्विक फ्लोअर हे स्नायूंचं जाळं मूत्राशय, आतडे आणि कोअरला आधार देतं. हे स्नायू कमकुवत किंवा खूप ताणलेले असतील तर अनेक समस्या उद्भवू शकतात.

Pelvic Floor Exercises

|

sakal

बेसिक केगल (Kegel Exercise)

मूत्र रोखल्यासारखे आणि गॅस रोखल्यासारखे स्नायू आतून हलकेच आवळा. 3-5 सेकंद होल्ड करा आणि हळूहळू सैल करा. दिवसातून 3 वेळा 10 रिपीटेशन करा.

Kegel Exercise

|

sakal

क्विक फ्लिक (Quick Flick)

शिंकताना किंवा हसताना स्नायूंना झटपट प्रतिसाद देण्यासाठी हा व्यायाम मदत करतो. स्नायू पटकन आवळा आणि लगेच सैल करा. 10-15 वेळा करा.

Quick Flick

|

sakal

एलिव्हेटर राइड (Elevator Ride)

पेल्विक फ्लोअरला लिफ्टसारखं समजा. हळूहळू पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरापर्यंत स्नायू आवळा. 5-10 सेकंद होल्ड करून सावकाश सैल करा. 5 वेळा करा.

Elevator Ride

|

sakal

डीप बेली ब्रीदिंग

पाठीवर झोपा आणि हळूहळू खोल श्वास घ्या. पोट वर-खाली होऊ द्या. हा व्यायाम पेल्विक फ्लोअरमधील ताण कमी करून स्नायूंना रिलॅक्स करतो.

Deep belly Breathing

|

sakal

ब्रिज पोझ (Bridge Pose)

गुडघे वाकवून पाठीवर झोपा. कंबर वर उचला आणि वरच्या स्थितीत हलका Kegel करा. 5 सेकंद होल्ड करून खाली या. 10 रिपीटेशन करा.

Setu Bandhasana(Restorative Bridge Pose)

| sakal

लक्षात ठेवा

दररोज नियमितपणे हे व्यायाम केल्यास काही आठवड्यांत फरक जाणवू शकतो. व्यायाम करताना वेदना होत असल्यास किंवा स्नायू ओळखण्यात अडचण येत असल्यास डॉक्टर किंवा पेल्विक फ्लोअर फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या.

Doctor's Advice | sakal

सलग 1 महिना जवासाच्या बिया खाल्ल्याने शरीरात कोणते बदल होतात?

What Happens if You Eat Flax Seeds for a Month

| sakal
आणखी वाचा