Women Health Issues: महिलांनो सावध व्हा! लहान दिसणाऱ्या आरोग्य समस्या ठरू शकतात धोकादायक

Monika Shinde

महिलांसाठी आरोग्य समस्या

लहान वाटणाऱ्या आरोग्य समस्या महिलांसाठी गंभीर ठरू शकतात. शरीर देत असलेल्या सूचक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठ्या आजारांचा धोका वाढू शकतो.

सततचा थकवा

थोड्याशा कामानंतरही सतत थकवा जाणवत असेल तर तो सामान्य समजू नका. हा अॅनिमिया, हार्मोनल बदल किंवा हृदयाशी संबंधित समस्येचा संकेत असू शकतो.

हृदयाचे वेगळे संकेत

महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे वेगळी असतात. जबड्यात दुखणे, श्वास लागणे किंवा अचानक कमजोरी जाणवणे ही हृदयाची चेतावणी असू शकते.

मासिक पाळीतील बदल

अनियमित पाळी, तीव्र वेदना किंवा जास्त रक्तस्राव हे दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत. हे पीसीओएस किंवा हार्मोनल असंतुलनाचे लक्षण असू शकते.

पोट आणि पचन

सतत आम्लपित्त, गॅस किंवा बद्धकोष्ठता होत असल्यास केवळ आहार दोष समजू नका. ही पचनसंस्थेच्या आजाराची सुरुवात असू शकते.

चक्कर येणे

अचानक उभं राहिल्यावर चक्कर येणे किंवा डोळ्यांसमोर अंधारी येणे ही रक्ताची कमतरता दर्शवू शकते. वेळेत तपासणी केल्यास धोका टाळता येतो.

प्रसूतीनंतरची मानसिक अवस्था

प्रसूतीनंतर सतत उदास वाटणे, रडू येणे किंवा चिंता वाढणे हे पोस्टपार्टम डिप्रेशनचे लक्षण असू शकते. यासाठी तज्ज्ञ मदत आवश्यक आहे.

Christmas Gifts: 'या' ख्रिसमसला द्या काही खास आणि अविस्मरणीय गिफ्ट्स

येथे क्लिक करा