लेडीज फर्स्ट! पहिलं द्विशतक ते वर्ल्डकप, पुरुष क्रिकेटपटूंच्या आधी पोरींनी नोंदवलेत भारी वर्ल्ड रेकॉर्ड

सूरज यादव

महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत आहे. दोन्ही संघ पहिल्या वहिल्या विजेतेपदासाठी सज्ज झाले आहेत.

From First World Cup To First Double Century Women Did It First

|

Esakal

महिला क्रिकेटमध्ये विक्रम

क्रिकेटमध्ये विशेषत: वनडेत अनेक असे विक्रम आहेत जे पुरुष क्रिकेटपटूंच्या आधी महिलांनी केले आहेत. १९७३ मध्ये महिलांचा तर १९७५ मध्ये पुरुषांचा वर्ल्ड कप खेळवण्यात आला होता.

From First World Cup To First Double Century Women Did It First

|

Esakal

पहिलं द्विशतक

एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कच्या (१९९७) नावावर आहे. तिने वर्ल्ड कपमध्ये ही कामगिरी केली होती. तिच्यानंतर सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्माने द्विशतक केलंय.

From First World Cup To First Double Century Women Did It First

|

Esakal

४०० पेक्षा जास्त धावा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका संघाने ४०० पेक्षा जास्त धावा करण्याचा पहिला मानही ऑस्ट्रेलियानं मिळवला. महिलांच्या संघानं बेलिंडा क्लार्कच्या द्विशतकाच्या जोरावर ५० षटकात ३ बाद ४१२ धावा केल्या होत्या.

From First World Cup To First Double Century Women Did It First

|

Esakal

पाच विकेट

वनडेत एका सामन्यात पाच विकेट घेण्याची कामगिरी पहिल्यांदा इंग्लंडची महिला क्रिकेटर टीना मॅकफर्सन हिने केली होती. १९७३ ला झालेल्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये १२ षटकात १४ धावात तिने पाच विकेट घेतल्या होत्या.

From First World Cup To First Double Century Women Did It First

|

Esakal

यष्टीरक्षणात विक्रम

एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात यष्टीरक्षकाने ६ जणांना तंबूचा रस्ता दाखवण्याची कामगिरी महिला क्रिकेटर्सनी आधी केली होती. भारताच्या कल्पना वेंकटाचार आणि न्यूझीलंडच्या सारा इलिंगवर्थ यांनी अशी कमाल आधी केली होती.

From First World Cup To First Double Century Women Did It First

|

Esakal

शतक आणि दहा विकेट

कसोटीत शतक आणि दहा विकेट घेण्याचे विक्रमही महिला क्रिकेटरच्या नावावर आहेत. ऑस्ट्रेलियाच्या बेट्टी विल्सनने १९५८ मध्ये ही कामगिरी केली होती.

From First World Cup To First Double Century Women Did It First

|

Esakal

पहिला टाय सामना

वनडे क्रिकेटमध्ये पहिला टाय सामना महिला क्रिकेटमध्येच झाला होता. १९८२ मध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील सामन्यात दोन्ही संघांनी समान १४७ धावा केल्या होत्या.

From First World Cup To First Double Century Women Did It First

|

Esakal

कमी वयात पदार्पण

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या महिला क्रिकेटरच्या नावे आहे. साजिदा शाहने वयाच्या १३ व्या वर्षी पाकिस्तानच्या संघात स्थान मिळवलं होतं.

From First World Cup To First Double Century Women Did It First

|

Esakal

भारत-द. आफ्रिका, पहिल्या वर्ल्ड कप विजेतेपदासाठी खेळणार, कसा होता स्पर्धेतला प्रवास?

Women’s World Cup 2025 India and South Africa’s road to the Final

|

Sakal

इथं क्लिक करा