Monika Shinde
घर आणि ऑफिस यांची सांगड घालताना सततची कामं, शारीरिक आणि मानसिक ताण, यामुळे महिलांचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्षच होत राहतं. त्यांच्यासाठी सुकं खोबरं हे एखाद्या औषधापेक्षा कमी नाहीये. दररोज सुकं खोबरं खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
सुकं खोबरं भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये एक महत्त्वाचे स्थान ठेवते. विशेषतः महिलांसाठी, याचे सेवन त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
महिलांमध्ये हॉर्मोनल बदल सतत होत असतात, विशेषतः मासिक पाळीच्या वेळी खाणे फायद्याचे आहे.
सुकं खोबरं पचनसंस्थेसाठी फायबर्सचा एक चांगला स्रोत आहे. हे कब्ज, गॅस, आणि अॅसिडिटी सारख्या पचनविषयक समस्या कमी करण्यास मदत करू शकते.
सुकं खोबरं त्वचेची देखभाल करण्यास मदत करते. यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा ताजेतवाने दिसते.
सुकं खोबऱ्यात फायबर्स, फॅटी ऍसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने हृदयाची सुरक्षा करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.
सुकं खोबरं हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम प्रदान करते, जे हाडांची मजबुती वाढवतात.
सुकं खोबरं वजन कमी करण्यास मदत करते. यामध्ये असलेले फायबर्स शरीरातिला भूक कमी करते.
Thyroid: शरीरात थायरॉईड कसे काम करते? जाणून घ्या