Monika Shinde
सोलो ट्रिप महिलांसाठी रोमांचक आणि स्वातंत्र्याचा अनुभव असतो. मात्र, प्रवास सुरू करण्यापूर्वी स्वतःची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या काही टिप्स फॉलो केल्यास तुमचा सोलो प्रवास अधिक आनंददायी आणि सुरक्षित होईल.
प्रवासाचा प्लॅन आधीच तयार ठेवा. प्रवासस्थळ, करायच्या गोष्टी, आणि वेळ यांचे योग्य नियोजन केल्याने गोंधळ टळेल आणि प्रवासाचा आनंद वाढेल.
प्रवासासाठी बॅगेत छोटं मेडिकल किट ठेवणं आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत हे उपयोगी ठरते.
प्रवासात महिलांसाठी स्वच्छतेच्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पी-सेफ स्प्रे, सॅनिटरी नॅपकिन्स, टॅम्पॉन्स, मेंस्ट्रुअल कप आणि हँड सॅनिटायझर ही वस्तू नेहमी बॅगेत ठेवावीत, कारण प्रवास कधी आणि कुठे नेईल हे सांगता येत नाही.
प्रवासाच्या तिकिटे आणि राहण्याची व्यवस्था आधीच बुक करा, त्यामुळे अंतिम क्षणी होणारी गडबड टाळता येईल. निवासस्थानाची माहिती आणि रिव्ह्यूज वाचून, सुरक्षित आणि योग्य ठिकाणांची निवड करा.
सुरक्षेसाठी पेपर स्प्रे आणि काही रक्कम रोख स्वरूपात ठेवा, कारण प्रत्येक ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नसेल.
प्रवासाचा आनंद घ्या, पण सुरक्षिततेकडे लक्ष द्या. स्वतःचे ड्रिंक्स घ्या आणि आसपासची परिस्थिती सतत लक्षात ठेवा.
Wall Paintings: वास्तुशास्त्रानुसार घरासाठी लावा 'ही' 7 भित्तीचित्रे, जाणून घ्या कोणती