World Chocolate Day: कधीच नाही ऐकले असे चॉकलेटबद्दलचे ७ फॅक्ट्स

Anushka Tapshalkar

चॉकलेटमध्ये असू शकतात किड्यांचे सूक्ष्म तुकडे!

ऐकून धक्का बसेल, पण कोकोची शेती उघड्या वातावरणात होत असल्याने चॉकलेटमध्ये अतिशय सूक्ष्म किड्यांचे अवशेष राहू शकतात. अन्न सुरक्षा नियमांनुसार हे आरोग्यासाठी हानिकारक नसतात.

Interesting Chocolate Facts No One Knows 

|

sakal 

डार्क चॉकलेटमध्ये जड धातूची शक्यता

डार्क चॉकलेटमध्ये नैसर्गिकरीत्या कॅडमियम आणि काहीवेळा लीडचे अंश आढळू शकतात. हे कोकोची लागवड, माती आणि प्रक्रिया यावर अवलंबून असते.

Interesting Chocolate Facts No One Knows 

|

sakal 

पहिलं 'चॉकलेट' गोड नव्हतंच!

आजचं गोड चॉकलेट नव्हे, तर हजारो वर्षांपूर्वी लोक कोको फळाच्या गरापासून तयार होणारे नैसर्गिकरित्या आंबवलेले मद्यपेय पित होते.

Interesting Chocolate Facts No One Knows 

|

sakal

कोको बिया एकेकाळी चलन होत्या

माया आणि अझ्टेक संस्कृतीत कोकोच्या बियांचा वापर पैशांप्रमाणे केला जात असे. इतकेच नाही, तर बनावट कोको बियाही तयार केल्या जात होत्या.

Interesting Chocolate Facts No One Knows 

|

Sakal

व्हाइट चॉकलेटला 'चॉकलेट'चा दर्जा उशिरा

व्हाइट चॉकलेटमध्ये कोको सॉलिड्स नसल्यामुळे अमेरिकेत त्याला अधिकृतपणे 'चॉकलेट' म्हणून 2002 मध्ये मान्यता मिळाली.

Interesting Chocolate Facts No One Knows 

|

sakal

चॉकलेट तोंडात लगेच का विरघळते?

यामागचं कारण म्हणजे कोको बटर. त्याचा वितळण्याचा बिंदू शरीराच्या तापमानापेक्षा किंचित कमी असल्याने चॉकलेट तोंडात गेल्यावर लगेच विरघळते.

Interesting Chocolate Facts No One Knows 

|

sakal 

चॉकलेटवर पांढरा थर म्हणजे खराब नाही

तापमान किंवा आर्द्रतेतील बदलामुळे चॉकलेटवर 'चॉकलेट ब्लूम' नावाचा पांढरा थर दिसू शकतो. त्यामुळे चव आणि पोत बदलू शकतो, पण बहुतांश वेळा ते खाण्यास सुरक्षित असते.

Interesting Chocolate Facts No One Knows 

|

sakal 

सलग 1 महिना जवासाच्या बिया खाल्ल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Flaxseeds | Sakal
आणखी वाचा