Anushka Tapshalkar
प्रत्येक वर्षी 7 जुलै रोजी जागतिक चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी चॉकलेट खाण्याचा आनंद guilt-free घेता येतो.
याच निमित्ताने आज ट्राय करा काही खास चॉकलेट रेसिपीज.
हे झटपट आणि स्वादिष्ट चॉकलेट डेसर्ट फक्त ५ मिनिटांत तयार होणारा हा एक सिंगल सर्व्ह केक आहे. एका कपात पीठ, कोको पावडर, साखर, दूध, तेल आणि थोडीशी बेकिंग पावडर मिसळा. मग ते १ ते २ मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये ठेवा, आणि तुम्हाला थोड्याच वेळात मऊ आणि चविष्ट केक मिळेल.
ओट्स, पीनट बटर, कोको पावडर आणि मध एकत्र करून तयार करा हेल्दी आणि एनर्जेटिक कुकीज. त्यासाठी तयार मिश्रणापासून छोटे गोळे तयार करून कुकीजचा आकार द्या आणि थंड होऊ द्या.
चॉकलेट वितळवून ते बेकिंग शीटवर पसरवा. त्यावर नट्स, ड्राय फ्रुट्स, चॉकलेट चिप्ससारखी टॉपिंग्स टाका. हे थंड होऊन घट्ट झाल्यावर त्याचे छोटे तुकडे करा. तुम्ही आवडीनुसार टॉपिंग्स घालून हे वेगळं बनवू शकता. हे तुमचं खास कस्टमाइज्ड गिफ्ट ही बनू शकतं.
ही फज रेसिपी फक्त कन्डेन्स्ड मिल्क, चॉकलेट चिप्स आणि बटरने बनते. सगळं गरम करून ट्रेमध्ये ओता, फ्रिजमध्ये थंड करा आणि चौकोनी तुकडे कापून खा.
या रेसिपीसाठी, चॉकलेट वितळवा आणि सिलिकॉन साच्यात लावून अर्धगोल तयार करा. त्यात कोको पावडर आणि छोटे मार्शमॅलो भरा, आणि दोन अर्धगोल एकत्र लावा. हे बॉम्ब गरम दूधात टाका आणि ते हळूहळू विरघळून स्वादिष्ट हॉट चॉकलेटचा आस्वाद घ्या.