Pranali Kodre
भारताची पहिली महिला क्रिकेट वर्ल्ड कप विजेती कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा मोठा सन्मान करण्यात आला आहे.
Harmanpreet Kaur Conferred Padma Shri
Sakal
२५ मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. २५ मे रोजी २ पद्म विभूषण, ६ पद्मभूषण आणि ५८ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Harmanpreet Kaur Conferred Padma Shri
Sakal
या पुरस्कार विजेत्यांमध्ये हरमनप्रीत कौरचाही समावेश होता. हरमनप्रीत कौर हिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वाच्च नागरी पुरस्कार आहे.
Harmanpreet Kaur Conferred Padma Shri
Sakal
दरम्यान भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा यालाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, पण तो हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित नव्हता.
Rohit Sharma
Sakal
हरमनप्रीत कौरने गेली अनेकवर्षे भारतीय महिला संघाकडून खेळताना नवनवीन यशाची शिखरे गाठली. तिच्याच नेतृत्वात भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच २०२५ मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला.
Harmanpreet Kaur Conferred Padma Shri
Sakal
हरमनप्रीत कौरने आत्तापर्यंत ७ कसोटी, १६४ वनडे आणि १९५ टी२० सामने खेळले आहेत. तिने या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८७०० हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच ७० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
Harmanpreet Kaur Conferred Padma Shri
Sakal
हरमनप्रीत कौर आता टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
Harmanpreet Kaur Conferred Padma Shri
Sakal
IPL 2026 Playoff Record
Sakal