Pranali Kodre
आयपीएल २०२६ स्पर्धेचे अखेर प्लेऑफचे ४ संघ मिळालेत. हे ४ संघ निश्चित होण़्यासाठी तब्बल ६९ सामन्यांची वाट पाहायला लागली.
IPL 2026 Playoff Record
Sakal
राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला २४ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर हरवलं आणि प्लेऑफची उरलेली चौथी जागा मिळवली.
Rajasthan Royals
Sakal
राजस्थानच्या आधीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं.
IPL 2026 Playoff Record
Sakal
पण यंदाच्या आयपीएलचा सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणार नाही.आयपीएलमध्ये असं पहिल्यांदाच घडलंय की प्लेऑफमध्ये पोहणारे चारही संघ माजी विजेते आहेत.
IPLTrophy
Sakal
यापूर्वी प्रत्येकवेळी प्लेऑफमध्ये पोहचणाऱ्या ४ संघांपैकी एक तरी संघ असा असायचा ज्याने ट्रॉफी जिंकलेली नव्हती.
IPL 2026 Playoff Record
Sakal
पण यावेळी प्लेऑफमध्ये पोहचलेले RCB, गुजरात, हैदराबाद आणि राजस्थान हे चारही संघांनी प्रत्येकी एक ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे जो संघ जिंकेल, त्याची ही आयपीएलमधील दुसरी ट्रॉफी असणार आहे.
IPL 2026 Playoff Record
Sakal
राजस्थानने २००८ मध्ये, हैदराबादने २०१६ मध्ये, गुजरातने २०२२ मध्ये, तर RCB ने २०२५ मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
IPL 2026 Playoff Record
Sakal
आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की RCB ला मुंबई इंडियन्स - चेन्नई सुपर किंग्सच्या पंक्कीत बसण्याचीही संधी आहे, पण त्यासाठी त्यांना यावर्षी आयपीएल जिंकावी लागेल.
RCB
Sakal
कारण यापूर्वी केवळ मुंबई आणि चेन्नई हे असे दोनच संघ आहेत, ज्यांनी लागोपाठ आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
CSK & MI
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Vaibhav Sooryavanshi Family
Sakal