राणीसोबत रात्री कोण झोपणार? लैंगिक संबंध ठेवायची इच्छा झाली की...; कुस्तीने ठरायचा निर्णय!

सकाळ डिजिटल टीम

राणी न्झिंगा कोण होती?

इतिहासातील काही राजे-राण्यांच्या कथा ऐकताना विश्वास बसणे कठीण जाते. काही कथा अंगावर काटा आणणाऱ्या असतात, तर काही थक्क करणाऱ्या. अशीच एक थरारक आणि वादग्रस्त कहाणी आहे नैऋत्य आफ्रिकेतील अँडोंगो आणि माताम्बा राज्यावर राज्य करणाऱ्या राणी न्झिंगा (Nzinga Mbandi) हिची.

Queen Nzinga Mbande History

|

esakal

राजकारणात निष्णात शासक

१६२४ साली तिने अँडोंगोची सत्ता आपल्या हाती घेतली. ती केवळ राणी नव्हती, तर अत्यंत बुद्धिमान, धाडसी आणि राजकारणात निष्णात अशी शासक होती.

Queen Nzinga Mbande History

|

esakal

न्डोंगोच्या सिंहासनावर विराजमान

तिचे वडील न्गोला किलुआंजी किआ सांबा हे देखील राजा होते. त्यांच्या नावातील “न्गोला” या शब्दावरूनच पुढे “अंगोला” हे देशाचे नाव पडल्याचे मानले जाते. न्झिंगाचा जन्म १५८३ मध्ये झाला. भावाच्या मृत्यूनंतर तिने न्डोंगोच्या सिंहासनावर विराजमान होत सत्ता स्वीकारली.

Queen Nzinga Mbande History

|

esakal

न्झिंगाच्या चातुर्याचा किस्सा

न्झिंगाच्या चातुर्याचा एक प्रसिद्ध किस्सा इतिहासात नमूद आहे. १६२२ मध्ये ती पोर्तुगीज गव्हर्नरची भेट घेण्यासाठी गेली होती. मात्र, तिचा अपमान करण्याच्या उद्देशाने गव्हर्नरने तिच्यासाठी खुर्चीच ठेवली नाही, जेणेकरून तिला खाली बसावे लागेल. हे लक्षात येताच न्झिंगाने एका सेवकाला इशारा केला आणि त्या सेवकाने गुडघे टेकून बसून राणीला आसन दिले. या प्रसंगानंतर “न्झिंगा ही जन्मत:च राणी होती,” असे म्हटले जाऊ लागले.

Queen Nzinga Mbande History

|

esakal

सत्तेसाठी प्रियकराचाही त्याग

इतिहासातील काही उल्लेखांनुसार, न्झिंगा एका आफ्रिकन योद्ध्यावर प्रेम करत होती. मात्र, सत्ता आणि राज्यकारभारासाठी तिला त्या प्रेमाचा त्याग करावा लागला. काही इतिहासकारांचे मत आहे, की त्या योद्ध्याकडून लष्करी किंवा राजनैतिक पातळीवर गंभीर चूक झाली होती. त्यामुळे राणीने कठोर निर्णय घेत युद्धात त्याचा बळी दिला.

Queen Nzinga Mbande History

|

esakal

लैंगिक संबंधांची इच्छा

न्झिंगाच्या आयुष्याशी संबंधित अनेक दंतकथा आजही चर्चेत आहेत. त्यापैकी एक दंतकथा अशी की तिच्या राजवाड्यात स्त्रियांच्या पोशाखात राहणाऱ्या पुरुषांचा एक विशेष गट होता. राणीला लैंगिक संबंधांची इच्छा झाली की त्यांच्यातून एकाची निवड केली जात असे.

Queen Nzinga Mbande History

|

esakal

राणीचा असा मिळायचा सहवास

अधिक धक्कादायक दावा असा की, राणीसोबत कोण रात्र घालवणार हे ठरवण्यासाठी पुरुषांमध्ये कुस्ती किंवा लढत होत असे. जो जिंकेल, त्यालाच राणीचा सहवास लाभत असे.

Queen Nzinga Mbande History

|

esakal

पुरुषाला जिवंत जाळायचे

काही कथांनुसार, राणीसोबत रात्र घालवलेल्या पुरुषाला दुसऱ्या दिवशी जिवंत जाळले जाई. मात्र हे सर्व दावे अपुष्ट आणि दंतकथांवर आधारित असल्याचे इतिहासकार स्पष्ट करतात.

Queen Nzinga Mbande History

|

esakal

मृत्यूनंतरही भीती कायम

राणी न्झिंगाची दहशत तिच्या मृत्यूनंतरही कायम होती, असे सांगितले जाते. काही कथांनुसार, पोर्तुगीज अधिकारी तिच्या थडग्याजवळ जाण्यास घाबरत होते. स्थानिक लोकांचा विश्वास होता की न्झिंगाचा आत्मा अजूनही त्यांच्या भूमीचे आणि राज्याचे रक्षण करत आहे.

Queen Nzinga Mbande History

|

esakal

Ancient Indian Fort : भारतातील पहिला किल्ला कोणता? 4,600 वर्षांपूर्वीचे असे सत्य जे तुम्हाला थक्क करेल!

Harappa Civilization Fortification System

|

esakal

येथे क्लिक करा...