संतोष कानडे
रत्नापूर भागात राहणाऱ्या गरीब मजुराचं आयुष्य एका दगडामुळे बदलून गेलं आहे.
एक मजूर पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदत होता. तेव्हा अचानक त्याला काहीतरी वेगळं दिसलं.
त्याचं फावडं कुठल्यातरी चमकदार दगडाला आदळलेलं होतं. सुरुवातीला त्याला तो एक साधारण दगड वाटला.
परंतु जेव्हा तो दगड स्वच्छ केला, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. श्रीलंकेतल्या रत्नापूर इथली ही घटना आहे.
हा दगड म्हणजे दुसरं-तिसरं काही नव्हतं. जगातला आजवरचा सगळ्यात मोठा नीलम दगड होता.
या दगडाचं वजन २.५ मिलियन कॅरेट आहे. म्हणजे साधारण ५१० किलोग्रॅम एवढं याचं वजन आहे.
रत्नशास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी या दगडाची किंमत १०० मिलियन अमेरिकी डॉलर संगितली आहे.
म्हणजे साधारण 8,92,65,00,000 रुपये इतकी किंमत या नीलम दगडाची आहे.
श्रीलंकेतल्या जेम अँड ज्वेलरी अथॉरिटीने या दगडाची तपासणी केली आणि ते एका मतावर पोहोचले.
हा दगड जातल्या सगळ्यात मोठा स्टार सफायर असल्याचं अथॉरिटीने घोषित केलं आहे.
या स्टार सफायरचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर उजेड पडताच त्यात ६ किरणांचा तारा चमकतो.
या दगडा दोन्ही बाजूंनी तारा दिसतो, त्यामुळे हे रत्न अतिशय दुर्मिळ प्रकारांपैकी एक आहे.
ही घटना २०२१ मधली असली तरी आता सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.