Common Indian Wolf Snake : डोकं चपटं अन् चमच्यासारखं... जगातील सर्वात लांब 'कवड्या' पुण्यात; दापोडीत आढळला 1 मीटर लांबीचा बिनविषारी साप

बाळकृष्ण मधाळे

दापोडीत आढळला

पुण्याजवळील दापोडी परिसरात जगातील सर्वाधिक लांबीचा कॉमन इंडियन वुल्फ स्नेक (कवड्या साप) आढळून आला आहे.

Common Indian Wolf Snake

|

esakal

बिनविषारी

हा बिनविषारी साप असून त्याची एकूण लांबी १,०२१ मिमी (१.०२१ मीटर) इतकी नोंदविण्यात आली आहे.

Common Indian Wolf Snake

|

esakal

जगातील सर्वात लांब साप

स्वतंत्र पडताळणी आणि छायाचित्रांसह झालेल्या वैज्ञानिक नोंदीनुसार, हा आतापर्यंत नोंदविण्यात आलेला जगातील सर्वात लांब कॉमन इंडियन वुल्फ स्नेक ठरला आहे.

Common Indian Wolf Snake

|

esakal

महत्त्वपूर्ण शोध

या महत्त्वपूर्ण शोधावरील अभ्यास 'हर्पेटोलॉजी नोट्स' या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. त्यामुळे या शोधाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही वैज्ञानिक मान्यता मिळाली आहे.

Common Indian Wolf Snake

|

esakal

नवीन जागतिक नोंद

यापूर्वी कॉमन इंडियन वुल्फ स्नेकची कमाल नोंदवलेली लांबी सुमारे ९५० मिमी होती. मात्र, दापोडीत आढळलेल्या या सापाने तो विक्रम मोडीत काढत नवीन जागतिक नोंद प्रस्थापित केली आहे.

Common Indian Wolf Snake

|

esakal

कुठे आढळतो साप?

कॉमन इंडियन वुल्फ स्नेक हा साप भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि आग्नेय आशियातील काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. मराठीत या सापाला कवड्या किंवा कवडी साप असे म्हणतात.

Common Indian Wolf Snake

|

esakal

मण्यार सापासारखा दिसतो

मण्यार सापासारखा दिसत असल्यामुळे अनेकदा लोक या बिनविषारी सापाला विषारी समजून मारतात. मात्र, कवड्या सापाची काही वैशिष्ट्ये त्याला मण्यारपासून वेगळे ओळखण्यास मदत करतात.

Common Indian Wolf Snake

|

esakal

डोके चपटे अन् चमच्यासारखे

या सापाचे डोके थोडे चपटे आणि चमच्यासारखे असून ते मानेपेक्षा स्पष्टपणे वेगळे दिसते. त्याचे खवले सर्वत्र सारखे आणि गुळगुळीत असतात. तसेच शरीरावरील पट्टे डोक्याजवळ अधिक ठळक दिसतात आणि शेपटीकडे जाताना ते हळूहळू फिकट होत जातात.

Common Indian Wolf Snake

|

esakal

तज्ज्ञांचं काय मत?

तज्ज्ञांच्या मते, कवड्या साप हा बिनविषारी असून पर्यावरणातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे अशा सापांबाबत भीती न बाळगता त्यांचे संरक्षण करणे आणि साप आढळल्यास प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

Common Indian Wolf Snake

|

esakal

Raigad Albino Snake : हा साप 'बिनविषारी', पण दिसतो एकदम वेगळा! रायगडमध्ये सापडलेल्या 'अल्बिनो चंचु वाळा' सापाविषयी तुम्हाला 'हे' माहीत आहे का?

Rare Albino Snake Found in Raigad

|

esakal

येथे क्लिक करा...