जगातील सर्वात महागडी भाजी! किंमत तब्बल 85 हजार रुपये, कुठे मिळते?

बाळकृष्ण मधाळे

भाज्यांच्या दरात मोठी वाढ

सध्या वाढती महागाई सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका देत आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंसह भाज्यांच्या दरातही मोठी वाढ होताना दिसत आहे. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की जगात अशीही एक भाजी आहे, जिने किमतीच्या बाबतीत सर्व विक्रम मोडले आहेत?

World Most Expensive Vegetable

|

esakal

जगातील सर्वात महागडी भाजी कोणती?

‘हॉप शूट्स’ (Hop Shoots) ही केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात महागडी भाजी मानली जाते. बाजारात या भाजीची किंमत प्रतिकिलो सुमारे 85 हजार ते 1 लाख रुपये इतकी आहे.

World Most Expensive Vegetable

|

esakal

ही भाजी कुठे आढळते?

हॉप शूट्स ही भाजी प्रामुख्याने बिहार आणि हिमाचल प्रदेश या भागांत आढळते. अत्यंत मर्यादित प्रमाणात मिळत असल्याने तिची मागणी अधिक आणि उपलब्धता कमी असते.

World Most Expensive Vegetable

|

esakal

शेती का आहे अवघड?

हॉप शूट्सची शेती करणे अत्यंत कष्टाचे काम आहे. या भाजीतली कोवळी कोंब (shoots) शेतकऱ्यांना स्वतः शोधून हातानेच तोडावी लागतात. यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत, वेळ आणि संयम आवश्यक असतो.

World Most Expensive Vegetable

|

esakal

किंमत जास्त असण्यामागचे कारण

हॉप शूट्समध्ये ह्यूमुलोन (Humulone) आणि लुपोलन (Lupulone) यांसारखी नैसर्गिक ॲसिड्स आढळतात. ही घटकद्रव्ये आरोग्यासाठी उपयुक्त मानली जातात, त्यामुळे या भाजीला मोठी मागणी असून किंमतही प्रचंड जास्त आहे.

World Most Expensive Vegetable

|

esakal

कष्टाची शेती आणि औषधी गुणधर्म

महागाईच्या काळात अशी महागडी भाजी ऐकूनच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो, मात्र तिची दुर्मिळता, कष्टाची शेती आणि औषधी गुणधर्म यामुळे हॉप शूट्स जगातील सर्वात महागडी भाजी ठरली आहे.

World Most Expensive Vegetable

|

esakal

Amla Benefits : दररोजचा एक आवळा बनवतो शरीर लोखंडासारखे! तुमच्यासाठी कसा फायदेशीर ते जाणून घ्या...

Amla Benefits

|

esakal

येथे क्लिक करा...