सावध रहा! 'हा' आहे जगातील सर्वात विषारी पक्षी; स्पर्श केला तरी येऊ शकतो हार्ट अटॅक

सकाळ डिजिटल टीम

विषारी पक्षी

जगातील सर्वात विषारी पक्षी कोणता आहे आणि तो कुठे अढळतो जाणून घ्या या पक्षाची महिती.

Hooded Pitohui

|

sakal 

पहिला विषारी पक्षी

१९९० च्या दशकापर्यंत जगभरात असे मानले जात होते की पक्षी विषारी नसतात. परंतु, शास्त्रज्ञ जॅक डंबाचेर यांनी चुकून या पक्ष्याचा स्पर्श केल्यावर त्यांना शरीरात जळजळ आणि सुन्नपणा जाणवला, तेव्हा या पक्ष्याच्या विषारीपणाचा शोध लागला.

Hooded Pitohui

|

sakal 

आढळस्थान

हा पक्षी प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम पॅसिफिक महासागरातील पापुआ न्यू गिनी या देशाच्या घनदाट पर्जन्यवनांमध्ये आढळतो.

Hooded Pitohui

|

sakal 

घातक बॅट्राकोटॉक्सिन

या पक्ष्याच्या त्वचेत आणि पंखांमध्ये बॅट्राकोटॉक्सिन नावाचे अत्यंत घातक 'न्यूरोटॉक्सिन' असते. हेच विष दक्षिण अमेरिकेतील प्रसिद्ध 'पॉइजन डार्ट' बेडकांमध्येही आढळते.

Hooded Pitohui

|

sakal 

विषाचा स्रोत

हा पक्षी स्वतः विष तयार करत नाही. तो जंगलातील विशिष्ट प्रकारचे विषारी कीडे (Melerydae Beetles) खातो. या कीटकांच्या माध्यमातून हे विष त्याच्या शरीरात जमा होते.

Hooded Pitohui

|

sakal 

हार्ट अटॅकचा धोका

जर या पक्ष्याचे विष मानवी शरीरात जास्त प्रमाणात गेले, तर ते मज्जासंस्थेवर थेट हल्ला करते. यामुळे स्नायूंचा अर्धांगवायू (Paralysis) होऊ शकतो आणि अत्यंत गंभीर स्थितीत हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊन मृत्यू ओढवू शकतो.

Hooded Pitohui

|

sakal 

गंधावरून ओळख

या पक्ष्याला एक विशिष्ट प्रकारचा उग्र गंध येतो. या वासावरूनच शिकारी प्राणी याच्यापासून दूर राहतात. हा गंध त्याच्या शरीरातील विषाचा पुरावा असतो.

Hooded Pitohui

|

sakal 

संरक्षण यंत्रणा

हा पक्षी आपल्या विषाचा वापर शिकारीसाठी नाही, तर स्वसंरक्षणासाठी करतो. साप, ससाणे आणि इतर भक्षक या पक्ष्यावर हल्ला करत नाहीत, कारण त्यांनाही याच्या विषारीपणाचा अनुभव असतो.

Hooded Pitohui

|

sakal 

निसर्गाची किमया

हुडेड पिटोहुई हे सिद्ध करतो की केवळ साप किंवा कोळीच नाही, तर पक्षी देखील उत्क्रांतीमध्ये स्वतःला विषारी बनवू शकतात. हा पक्षी आजही शास्त्रज्ञांसाठी अभ्यासाचा विषय आहे.

Hooded Pitohui

|

sakal 

जगातील पहिले शहर कोणते होते? आज त्याची स्थिती काय?

World's first city Uruk

|

ESakal

येथे क्लिक करा