जगातील सर्वात रोमँटिक पक्षी! माणसांनाही लाजवेल असा आहे त्याचा अंदाज; रंगीबेरंगी भेटवस्तू देऊन मादीला करतो आकर्षित

बाळकृष्ण मधाळे

जगातील सर्वात रोमँटिक पक्षी!

मादीला आकर्षित करण्यासाठी सुंदर झोपडी, रंगीबेरंगी भेटवस्तू आणि खास नृत्य! बावरबर्डची प्रेम व्यक्त करण्याची अनोखी पद्धत तुम्हाला थक्क करेल.

World's most romantic bird

|

esakal

कुठे आढळतो हा पक्षी?

बावरबर्ड प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी आणि आसपासच्या बेटांवर आढळतो. या पक्ष्यांच्या सुमारे २० प्रजाती जगात आहेत.

World's most romantic bird

|

esakal

मादीसाठी बांधतो खास झोपडी

मादीला आकर्षित करण्यासाठी नर बावरबर्ड काड्या, पाने आणि गवत वापरून खास रचना तयार करतो. तिला 'बावर' असे म्हणतात.

World's most romantic bird

|

esakal

झोपडीची रंगीबेरंगी सजावट

निळे दगड, फुले, शिंपले, काचेचे तुकडे आणि चमकणाऱ्या वस्तूंनी नर आपली झोपडी सजवतो.

World's most romantic bird

|

esakal

झोपडीसाठी अनेक आठवड्यांची मेहनत

झोपडी बांधण्यासाठी नर अनेक आठवडे मेहनत घेतो. तिची सजावट सतत सुधारतो. दुसऱ्या पक्ष्याने झोपडी उद्ध्वस्त केली, तरी तो पुन्हा नव्याने सुरुवात करतो.

World's most romantic bird

|

esakal

मादीसाठी खास भेटवस्तू!

फळे, बेरी, कीटक आणि चमकणाऱ्या वस्तू गोळा करून नर मादीसमोर आकर्षक भेटवस्तूंची मांडणी करतो.

World's most romantic bird

|

esakal

प्रेमासाठी खास नृत्य

पंख फडफडवणे, डोके हलवणे आणि वेगवेगळ्या आवाजांची नक्कल करणे, अशा अनोख्या नृत्यातून नर मादीचे लक्ष वेधतो.

World's most romantic bird

|

esakal

मादीच निवडते आपला जोडीदार

मादी नराची झोपडी, सजावट आणि नृत्य पाहून योग्य जोडीदार निवडते. नराची मेहनत आणि आकर्षक प्रदर्शन तिच्या निर्णयात महत्त्वाचे ठरते.

World's most romantic bird

|

esakal

प्रेमाची अनोखी कहाणी

जोडीदार निवडल्यानंतर अंडी घालणे आणि पिल्लांचे संगोपन करण्याची जबाबदारी मादी सांभाळते. तर, नर पुन्हा दुसऱ्या मादीला आकर्षित करण्याच्या प्रयत्नात लागतो. निसर्गातील प्रेमाची ही अनोखी पद्धत खरोखरच आश्चर्यकारक आहे.

World's most romantic bird

|

esakal

Bird Lifespan : पक्षी किती वर्षे जगतात? म्हातारपणी त्यांची पिसे पांढरी होतात का?

How long do birds live

|

esakal

येथे क्लिक करा...