सकाळ डिजिटल टीम
जगभरात अशी काही पर्यटनस्थळं आहे, जी रोमँटिक ठिकाणं म्हणून प्रसिद्ध आहेत. ही सुंदर ठिकाणं नेमकी कोणती आहेत, ते पाहूया.
फ्रान्समधलं पॅरिस. खरंतर या शहराला प्रेमाचा राजधानी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयफेल टॉवरची रोषणाई अन् एलिसीसवरचा वॉक.. अप्रतिमच
इटलीतलं व्हेनिस हे ठिकाण. येथे रस्त्यांऐवजी पाण्याच्या कालव्यांवर वसलेले शहर आहे. गोंडोला राईड, जुने पूल आणि ऐतिहासिक वास्तुकलेचा रोमँटिक अनुभव येतो.
ग्रीसमधलं सेंटोरिनी हे ठिकाणचा सूर्यास्त एखाद्या स्वप्नासारखा भासतो. तसेच एजियन समुद्रावरील पांढऱ्या आणि निळ्या रंगाची घरे आणि व्हिसा बघायची मजाच न्यारी.
हिंद महासागरातलं हे एक बेट. हा एक वॉटर व्हिला आहे. क्रिस्टल क्लीअर पाणी आणि पांढरी शुभ्र वाळू.. इथे शांतता आणि एकांत हवा असलेल्या जोडप्यांसाठी स्वर्गाहून सुंदर ठिकाण.
जपानमधलं क्योतो या ठिकाणी प्राचीन मंदिरे आहेत. तसेच चेरी ब्लॉसम्स असून शांत बागा आहेत. जपानची पारंपारिक संस्कृती अनुभवता येऊ शकते.
बोगेनव्हिलिया कोस्ट इटलीमध्ये आहे. येथे उंचच उंच कड्यांवर रंगीबेरंगी गावं वसलेली आहेत. इथूनच भूमध्य समुद्राचे विहंगम दृश्य आणि सुंदर समुद्रकिनारे नजरेस पडतात.
जुन्या काळातलं रोमान्सचं ठिकाण म्हणून हवाना या ठिकाणाचा उल्लेख होतो. हे ठिकाण क्यूबामध्ये आहे. विंटेज कार्स, रंगीत वसाहती, लाईव्ह संगीत आणि ऐतिहासिक वातावरण.. हा एक वेगळा रोमँटिक अनुभव आहे.