पुजा बोनकिले
दरवर्षी ८ जून रोजी जागतिक समुद्र दिन साजरा केला जातो.
यादिनानिमित्त जाणून घेऊया समुद्रावर फिरण्याचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत.
व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर फिरणे हा एक उत्तम मार्ग असू शकतो.
समुद्रकिनाऱ्यावर चालताना तुम्हाला चांगला चालण्याचा अनुभव मिळतो आणि जर तुम्ही समुद्रात डायव्हिंग करून पोहायला गेलात तर वेगळे कार्डिओ करण्याची गरज नाही.
समुद्र किनाऱ्यावर चालणे एक उत्तम पर्याय आहे. कारण समुद्र किनाऱ्याची ताजी हवा मनाला शांत करते आणि आराम देते.
उन्हात बसून समुद्राच्या लाटा पाहिल्याने मनाला आनंद मिळतो. यामुळे नैराश्यासारख्या भावना कमी होतात.
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश महासागराचे रक्षण करणे, जैवविविधता राखणे आणि महासागरातील संसाधनांचे नुकसान रोखणे आहे.