जगातल्या सर्वात लांब १० ऑईल पाईपलाईन; फोटो बघून थक्क व्हाल

संतोष कानडे

लाखो बॅरल तेल

जगभरात दररोज लाखो बॅरल तेल वाहून नेण्यासाठी हजारो किलोमीटर लांब पाइपलाइन्सचे जाळे विणलेले आहे. या पाइपलाइन्स केवळ इंधन पुरवत नाहीत, तर देशांची अर्थव्यवस्था टिकवून ठेवतात.

सायबेरिया

पूर्व सायबेरिया-पॅसिफिक महासागर (ESPO)  ही जगातील सर्वात लांब पाइपलाइन्सपैकी एक आहे. याची लांबी ४,८५७ किमी असून रशियाच्या सायबेरियातून थेट प्रशांत महासागरापर्यंत जाते.

द्रुझबा

'द्रुझबा' म्हणजे रशियन भाषेत 'मैत्री' ही जगातील जुनी आणि महत्त्वाची पाइपलाइन आहे. याची लांबी ४,००० किमी पेक्षा जास्त असून रशियातून सुरू होऊन युरोपमधील ६ देशांपर्यंत पोहोचते.

अमेरिकेची जीवनरेखा

कीस्टोन ही पाईपलाईन उत्तर अमेरिकेची जीवनरेखा असून कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील व्यापाराचा हा मुख्य आधार आहे. लांबी: ३,४५६ किमी, मार्ग: कॅनडाच्या अल्बर्टापासून अमेरिकेच्या टेक्सास आणि इलिनॉयपर्यंत

जॉर्जिया

Baku-Tbilisi-Ceyhan (BTC) ही पाइपलाइन भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. याची लांबी: १,७६८ किमी असून अझरबैजान, जॉर्जिया आणि तुर्की या देशांतून जाते.

चीन

कझाकिस्तान-चीन पाइपलाइन ही चीनची पहिली थेट तेल आयात पाइपलाइन आहे. याची लांबी: २,२२८ किमी असून मार्ग कझाकिस्तानच्या कॅस्पियन किनाऱ्यापासून चीनच्या शिनजियांगपर्यंत असा आहे.

आफ्रिका

East African Crude Oil Pipeline (EACOP) ही आफ्रिकेतील सर्वात लांब तापवलेली पाइपलाइन आहे. याची लांबी १,४४३ किमी असून युगांडा ते टांझानियाचा टांगा पोर्ट इथपर्यंत तेल पोहोचवते.

अर्थव्यवस्थेचा कणा

इराक-तुर्की ही पाईपलाईन अनेक संघर्षांनंतरही इराकच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. या लाईनची लांबी ९०० किलोमीटर आहे. इराकच्या किरकुकपासून तुर्कीच्या जेयान बंदरापर्यंत तेल पोहोचवते.

अलास्का प्रांत

ट्रान्स-अलास्का ही पाईपलाईन अमेरिकेच्या अलास्का प्रांतातील कडाक्याच्या थंडीत ही कार्यरत असते. लांबी: १,३०० किमी. मार्ग: अलास्काच्या प्रुडहो बे पासून वाल्डेज बंदरापर्यंत.

चीन-म्यानमार

चीन-म्यानमार पाइपलाइन ८०० किलोमीटर लांबीची आहे. मलक्का सामुद्रधुनीतील धोका टाळण्यासाठी चीनने हा मार्ग निवडला आहे. मार्ग: म्यानमारचे क्यौकप्यू बंदर ते चीनचा युन्नान प्रांत.

नॉनव्हेज खावं की नाही? आयुर्वेदात काय सांगितलंय?

<strong>येथे क्लिक करा</strong>