जगातील सर्वात धोकादायक मासा, सापापेक्षाही घातक विष; फक्त स्पर्शानेच माणसाचा घेतो जीव!

बाळकृष्ण मधाळे

सागरी जीव खायला आवडतात!

संपूर्ण जगभरात सीफूडप्रेमींची संख्या मोठी आहे. अनेकांना समुद्रातील विविध मासे, खेकडे आणि इतर सागरी जीव खायला आवडतात.

Stonefish Deadliest Fish

|

esakal

जगभरात माशांच्या असंख्य प्रजाती

माशांच्या असंख्य जाती जगभरात आढळतात, आणि प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे मासे खाण्याचा पर्याय निवडतो.

Stonefish Deadliest Fish

|

esakal

जगातील सर्वात घातक मासा!

मात्र, तुम्हाला ठाऊक आहे का की जगातील महासागरांमध्ये एक असा मासा आहे, जो अत्यंत विषारी आणि जीवघेणा आहे?

Stonefish Deadliest Fish

|

esakal

स्टोनफिश

त्याला स्टोनफिश म्हणतात. हा मासा दिसायला अगदी दगडासारखा असतो, त्यामुळे तो समुद्राच्या तळाशी सहज लपून राहतो आणि ओळखता येत नाही.

Stonefish Deadliest Fish

|

esakal

सापापेक्षाही घातक विष

तज्ञांच्या मते, स्टोनफिशचे विष सापाच्या विषापेक्षाही अधिक घातक असते. या माशाच्या शरीरावर असलेल्या काट्यांमध्ये विषारी द्रव असतो.

Stonefish Deadliest Fish

|

esakal

फक्त स्पर्शाने होतो मृत्यू

जर एखाद्याने चुकून या माशाला स्पर्श केला किंवा पाय ठेवला, तर काही सेकंदांत तीव्र वेदना होतात आणि योग्य उपचार न झाल्यास मृत्यू होऊ शकतो.

Stonefish Deadliest Fish

|

esakal

प्रशांत, हिंदी महासागरात आढळतो

स्टोनफिश प्रामुख्याने प्रशांत आणि हिंदी महासागराच्या किनाऱ्यांवर आढळतो. तो आपले शिकार जवळ येईपर्यंत शांतपणे लपून बसतो आणि नंतर विजेच्या वेगाने झडप घालतो.

Stonefish Deadliest Fish

|

esakal

समुद्रकिनारी फिरताना सावधान!

म्हणूनच, सागरी प्रवास करताना किंवा किनाऱ्याजवळ पाण्यात फिरताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, हा दगडासारखा दिसणारा मासा कधीही जीवघेणा ठरू शकतो!

Stonefish Deadliest Fish

|

esakal

Men Health Risks : 'हे' 5 गंभीर आजार महिलांपेक्षा पुरुषांना जास्त होतात; जाणून घ्या कोणते?

Men Health Risks

|

esakal

येथे क्लिक करा...