Anushka Tapshalkar
सामान्य कॉफीपेक्षा अनेक पटींनी महाग असलेली 'कोपी लुवाक' (Kopi Luwak) ही जगातील सर्वात महागड्या कॉफींपैकी एक मानली जाते.
World's Most Expensive Coffee Facts
sakal
कोपी लुवाकचा उगम इंडोनेशियामध्ये झाला. सुमात्रा, जावा, बाली आणि सुलावेसी या बेटांवर तिचे मुख्य उत्पादन होते.
World's Most Expensive Coffee Facts
sakal
ही कॉफी थेट झाडावरून काढली जात नाही. एशियन पाम सिव्हेट (Asian Palm Civet) नावाचा लहान सस्तन प्राणी पिकलेल्या कॉफीच्या चेऱ्या खातो.
World's Most Expensive Coffee Facts
sakal
प्राणी फळाचा गर पचवतो, पण कॉफीचे दाणे विष्ठेद्वारे बाहेर पडतात. हे दाणे गोळा करून स्वच्छ धुतले, वाळवले, भाजले आणि त्यानंतर कॉफी तयार केली जाते.
World's Most Expensive Coffee Facts
sakal
या प्रक्रियेमुळे कॉफीची चव अधिक स्मूद, कमी कडवट, चॉकलेटसारखी गोडसर आणि मातीच्या सुगंधाची असल्याचे सांगितले जाते.
World's Most Expensive Coffee Facts
sakal
उत्पादन मर्यादित असणे, दाणे गोळा करण्याची कष्टप्रद प्रक्रिया आणि अस्सल कोपी लुवाकची दुर्मिळ उपलब्धता यामुळे तिची किंमत किलोमागे शेकडो ते हजारो अमेरिकन डॉलर्सपर्यंत जाऊ शकते
World's Most Expensive Coffee Facts
sakal
आजही इंडोनेशियातील अनेक कॉफी प्लांटेशन आणि कॅफेमध्ये पर्यटकांना अस्सल कोपी लुवाक चाखण्याची संधी मिळते. तिची अनोखी निर्मिती प्रक्रिया आणि दुर्मिळता यामुळे ही कॉफी जगभर चर्चेत असते.
World's Most Expensive Coffee Facts
sakal
What Happens If You Eat Soaked Pumpkin Seeds Every Day for a Month