सकाळ डिजिटल टीम
साप, बेडूक, विंचू आणि कोळ्यांसारखे विषारी प्राणी तुम्ही अनेकदा ऐकले असतील.
Hooded Pitohui
esakal
परंतु, तुम्हाला माहीत आहे का? जगात एक असा पक्षीही आहे, जो स्वतःच्या शरीरात प्राणघातक विष घेऊन फिरतो.
Hooded Pitohui
esakal
न्यू गिनीमध्ये आढळणारा हूडेड पिटोहुई हा जगातील सर्वात विषारी पक्षी मानला जातो.
Hooded Pitohui
esakal
या पक्ष्याच्या त्वचेवर, पंखांमध्ये आणि शरीरातील काही भागांमध्ये बॅट्राकोटॉक्सिन नावाचे घातक न्यूरोटॉक्सिन आढळते.
Hooded Pitohui
esakal
नैसर्गिकरित्या आढळणारे हे विषारी संयुग अतिशय धोकादायक असून, ते पक्षाघात (परालिसिस) किंवा मृत्यूचेही कारण ठरू शकते.
Hooded Pitohui
esakal
हूडेड पिटोहुईच्या त्वचेवर आणि पंखांवर सर्वाधिक विष असते. त्याच्या चोचीने जरा जरी चावा घेतला, तरी माणसाच्या त्वचेला सुन्न करून टाकू शकते.
Hooded Pitohui
esakal
हा पक्षी स्वतः हे विष तयार करत नाही; तो आपल्या आहारातून विशेषतः विषारी किड्यांना खाऊन बॅट्राकोटॉक्सिन जमा करतो.
Hooded Pitohui
esakal
त्याच्या विषारी त्वचेचा आणि पंखांचा वास व चव यामुळे इतर जनावरे त्याच्यावर सहज हल्ला करत नाहीत. त्यामुळे तो शिकार होण्यापासून वाचतो.
Hooded Pitohui
Hooded Pitohui
प्रिय वाचकहो, आमची ही माहितीपूर्ण बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद! या लेखाचा उद्देश फक्त जागरूकता निर्माण करणे इतकाच आहे. या लेखासाठी विविध सामान्य माहिती आणि पारंपरिक स्रोतांचा आधार घेतला आहे. ई-सकाळ यातील कोणत्याही दाव्याची शाश्वती देत नाही.
Kashmir Tourism
Kashmir Tourism