Anushka Tapshalkar
जगातील सर्वात वयोवृद्ध, 114 वर्षीय मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांचे जलंधरमध्ये सकाळच्या फेरफटक्यात वाहनाच्या धडकेत निधन झाले. त्यांनी जगाला आरोग्यदायी आणि सकारात्मक जीवनशैलीचं प्रेरणादायी उदाहरण दिलं.
फौजा सिंग यांनी वयाच्या 89व्या वर्षी पहिला मॅरेथॉन धावली. कुटुंबाला गमावल्यानंतर दुःखावर मात करण्यासाठी त्यांनी धावणं स्वीकारलं.
टोरांटो मॅरेथॉनमध्ये 5 तास 40 मिनिटांत रेस पूर्ण करणं ही त्यांची सर्वोत्तम वेळ होती.
ते नेहमी म्हणायचे – “चिंता सोडा, हसत रहा आणि जगण्याचा आनंद घ्या.”
वयाच्या शंभरीनंतरही त्यांनी शिस्तबद्ध दिनचर्या कधीच सोडली नाही. दररोज 4 तास चालणं, 10 किमी धावणंस त्यांनी सुरुच ठेवलं.
फळं, भाज्या, पेज यावर आधारित आहार घेतला. पॅकेज्ड आणि तळलेले पदार्थ टाळले.
त्यांनी व्यसने टाळून शरीर व मन दोन्ही शुद्ध ठेवले.
त्यांचा धावण्यामागे आध्यात्मिक दृष्टीकोन होता. धावणं म्हणजेच साधना होती.
फौजा सिंग यांचं आयुष्य म्हणजे सकारात्मकता, साधेपणा आणि प्रेरणा यांचा सर्वोत्तम संगम.