आयफेल टॉवरपेक्षाही उंच! 'चिनाब रेल्वे पूल' पाहून थक्क व्हाल!

Aarti Badade

भारताच्या अभिमानाची ओळख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चिनाब रेल्वे पूलचं उद्घाटन. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, आयफेल टॉवरपेक्षाही उंच आहे.

PM Narendra Modi | sakal

दोन गावांना जोडणारा पूल

चिनाब नदीवर बांधलेला हा पूल बक्कल आणि कौडी गावांना जोडतो. उद्घाटनानंतर वंदे भारत ट्रेन याच पुलावरून धावणार.

Chenab Bridge | sakal

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

पुलाचा डिझाइन 260 किमी/ताशी वेगाच्या वाऱ्यांना सहन करू शकतो. भूकंपप्रवण झोन 5 मध्ये असूनही सुरक्षिततेची पक्की योजना.

Chenab Bridge | sakal

उंची आणि लांबीत विक्रमी

नदीच्या पातळीपासून 359 मीटर उंच आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आणि 1.3 किमी लांब.

Chenab Bridge | Sakal

प्रकल्पाची सुरुवात आणि खर्च

2017 मध्ये सुरुवात झालेला प्रकल्प, हवामान व भौगोलिक अडचणींमुळे खर्च 41,000 कोटींपेक्षा अधिक.

Chenab Bridge | Sakal

मजबुतीसाठी भक्कम पाया

पूल टिकावू ठेवण्यासाठी 30,000 टन स्टीलचा वापर. पूलाचा पाया फुटबॉल मैदानाच्या अर्ध्या भागाएवढा

Chenab Bridge | sakal

सुरक्षेसाठी लष्कर तैनात

चिनाब पुलाच्या संरक्षणासाठी भारतीय लष्कराच्या तुकड्या, 24x7 सुरक्षा व्यवस्था.

Chenab Bridge | sakal

प्रगतीशील रेल्वे प्रकल्प

USBRL प्रकल्पाची एकूण लांबी – 272 किमी,209 किमी काम पूर्ण, शिल्लक 17 किमीचा टप्पाही आता पूर्ण.

Chenab Bridge | Sakal

भव्यतेची एक झलक

फोटोमध्ये दिसणारी पुलाची भव्यता आणि भक्कम रचना. भारताच्या अभियांत्रिकी कौशल्याचा एक शानदार नमुना!

Chenab Bridge | Sakal

खुदा हाफिज आणि अल्लाह हाफिजमध्ये फरक काय?

Difference Between Khuda Hafiz and Allah Hafiz | Sakal
येथे क्लिक करा