डॉक्टरांनी सांगितल्या डायबेटिजसाठी सर्वात धोकादायक ते सर्वोत्तम दिवाळी मिठाई

Anushka Tapshalkar

दिवाळी

दिवाळीच्या गोड पदार्थांची आवड सर्वांनाच असते; परंतु डायबेटिज असलेल्या व्यक्तींना हे तितकं सुखदायक नसतं.

Diwali mithai

|

sakal

गुलाबजामुन आणि जलेबी – सर्वात धोकादायक!

तळलेले आणि साखरेच्या पाकात भिजवलेले हे गोड पदार्थ रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवतात. मधुमेह असलेल्या रुग्णांनी यापासून शक्यतो दूर राहावे.

Gulabjam and jalebi

|

sakal

रसगुल्ला आणि सोनपापडी – झटपट साखर वाढवणारे!

दोन्ही मिठाया साखरेने भरलेल्या असून त्यात फायबर कमी असते. एका छोट्या तुकड्यापुरते मर्यादित सेवनच योग्य.

Rasgulla and Sonpapdi

|

sakal

मैसूर पाक – मध्यम धोक्याची मिठाई

तूप आणि साखर यांचा समतोल असला तरी साखरेचे प्रमाण अधिक आहे. कमी साखर आणि जास्त घी वापरलेला घरगुती प्रकार निवडा.

Mhaisurpak

|

sakal

चुरमा लाडू – थोडीशी सुरक्षित मिठाई

तूप आणि गव्हामुळे काही फायबर मिळते, परंतु कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात असतात. जेवणानंतर एक छोटा लाडू पुरेसा आहे.

churma ladoo

|

sakal

नारळ बर्फी – मर्यादेत योग्य

नारळातील नैसर्गिक फॅट साखरेचे शोषण कमी करते. मात्र, प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे.

coconut barfi

|

sakal

बेसन लाडू – संतुलित पर्याय

बेसनमध्ये प्रोटीन आणि फायबर असते. कमी साखर व घी वापरलेले लाडू डायबेटिकसाठी योग्य पर्याय.

Besan ladoo

|

sakal

काजू कतली – नट बेस्ड आरोग्यदायी मिठाई

काजूमुळे चांगले फॅट्स आणि प्रोटीन मिळते. मात्र प्रमाण नियंत्रित ठेवा.

kaju katli

|

sakal

अंजीर रोल – सर्वात उत्तम पर्याय!

अंजीरातील नैसर्गिक साखर आणि फायबर रक्तातील साखर स्थिर ठेवते. डायबेटिक लोकांसाठी आदर्श गोड पदार्थ.

Anjeer Roll

|

sakal

साखरविरहित घरगुती मिठाया – स्मार्ट निवड

खजूर, नट्स, आणि अंजीर वापरून तयार केलेले गोड पदार्थ बाजारातील साखरयुक्त मिठायांपेक्षा सुरक्षित असतात.

Sugar Free Homemade Mithai

|

sakal

डॉक्टरांचा सल्ला – गोड खा, पण शहाणपणाने!

मिठाई खाण्यापूर्वी प्रोटीनयुक्त जेवण घेतल्यास साखरेचा परिणाम कमी होतो. दिवाळीचा उत्सव साजरा करताना आनंद घ्या, पण प्रमाण आणि जागरूकता ठेवा. योग्य मिठाईची निवड करा आणि सण guilt-free पद्धतीने साजरा करा.

Doctor's Advice | sakal

दिवाळीची मिठाई हेल्दी बनवा! वापरा साखरेला पर्यायी 'हे' गोड पदार्थ

Diwali Sweets

|

sakal

आणखी वाचा