WPL 2026: स्मृती मानधना ते जेमिमाह रोड्रिग्स, पाच संघांचे कोण आहेत कर्णधार?

Pranali Kodre

WPL 2026

वूमन्स प्रीमियर लीगचा चौथा हंगाम (WPL 2026) ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारीदरम्यान खेळवला जाणार आहे.

WPL 2026 Captains

|

Sakal

पाचही कर्णधार जाहीर

यंदाही पाच संघ सहभागी होणार असून या पाचही संघांचे कर्णधार जाहीर झाले आहेत.

Smriti Mandhana and Harmanpreet Kaur

|

Sakal

तीन कर्णधार कायम, तर दोन संघांत बदल

मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्सने कर्णधार कायम केले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्सने कर्णधार बदलले आहेत.

WPL 2026 Captains

|

Sakal

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सने दोन वेळची विजेती हरमनप्रीत कौरलाच कर्णधारपदी कायम केले आहे.

Harmanpreet Kaur

|

Sakal

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्मृती मानधनाला कर्णधारपदी कायम केले आहे. तिच्या नेतृत्वात संघाने २०२४ मध्ये विजेतेपद जिंकले होते.

Smriti Mandhana

|

Sakal

गुजरात जायंट्स

गुजरात जायंट्सनेही ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू ऍश्ले गार्डनर हिच्याकडे कर्णधारपद कायम ठेवले आहे.

Ashleigh Gardner

|

Sakal

युपी वॉरियर्स

युपी वॉरियर्सने ऑस्ट्रेलियाची सर्वात यशस्वी कर्णधार मेग लॅनिंगकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. तिने यापूर्वी WPL च्या पहिल्या तीन हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना उपविजेतेपद मिळवले होते.

Meg Lanning

|

Sakal

दिल्ली कॅपिटल्स

गेल्या तीन हंगामात उपविजेते राहिलेल्या दिल्ली कॅपिटल्सने चौथ्या हंगामासाठी भारताच्या जेमिमाह रोड्रिग्स हिला कर्णधारपदावर नियुक्त केले आहे.

Jemimah Rodrigues

|

Sakal

१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आत्तापर्यंत करियरमध्ये किती सिक्स मारले? थक्क करणारे आकडे

Vaibhav Suryavanshi’s Six-Hitting Stats

|

Sakal

येथे क्लिक करा