Pranali Kodre
वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा (WPL) तिसरा हंगाम १४ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार आहे.
या स्पर्धेत पहिल्या दोन्ही हंगामांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबई इंडियन्सने २०२३ मध्ये, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २०२४ मध्ये वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.
दरम्यान आत्तापर्यंत या स्पर्धेत दोन खेळाडूंनी हॅटट्रिक घेतली आहे.
या स्पर्धेत सर्वात पहिली हॅटट्रिक घेण्याचा विक्रम इंग्लंडच्या इझी वाँगच्या नावावर आहे.
वाँगने २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना युपी वॉरियर्सविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. तिने किरण नवगिरी, सिमरन शेख आणि सोफी इक्लेस्टोन यांना बाद केलं होतं.
दुसरी हॅट्रिक २०२४ हंगामात भारताच्या दिप्ती शर्माने घेतली. दिप्ती वूमन्स प्रीमियर लीगमध्ये हॅट्रिक घेणारी पहिलीच भारतीय क्रिकेटपटू ठरली.
दिप्तीने युपी वॉरियर्सकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. तिने मेग लॅनिंग, ऍनाबेल सदरलँड आणि अरुंधती रेड्डी यांना बाद केलं होतं.