Pranali Kodre
भारतात सध्या वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू असल्याने जगभरातील अनेक महिला क्रिकेटपटू भारतात आहेत.
याच स्पर्धेच्या व्यस्त वेळापत्रकातून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने थोडा वेळ काढून खेळाडू आणि संघातील स्टाफसाठी खास 'रिगल राँदेवू' (Regal Rendezvous) असा लखनौमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचा खेळाडूंनी मनमुराद आनंद घेतला.
विशेष म्हणजे भारतीय खेळाडूंसोबतच परदेशी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यही भारतीय पारंपारिक वेषात आले होते.
परदेशी खेळाडूंनीही साडी घातली होती. त्यामुळे त्या लक्षवेधी ठरल्या.
त्यातही ऑस्ट्रेलियाची दिग्गज एलिस पेरी आणि इंग्लंडची डॅनिएल वॅट-हॉज यांच्या देली गर्ल लूकनेही सर्वांचे लक्ष वेधले.
एलिस पेरीने सुंदर निळ्या रंगाची, तर डॅनिएलने पिवळ्या रंगाची साडी घातली होती.
खेळाडूंनी यावेळी डान्सही केला. या कार्यक्रमादरम्यानचे अनेक फोटोही आरसीबीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.