Vinod Dengale
आज चहाच्या टपरीपासून मोठ्या मॉलपर्यंत सर्वत्र UPI वापरलं जातं. डिजिटल पेमेंटची ही सर्वात लोकप्रिय पद्धत बनली आहे.
घाईत एक नंबर चुकला की पैसे चुकीच्या खात्यात जातात.
अनेकांना वाटतं UPI मध्ये Undo ऑप्शन असेल. पण प्रत्यक्षात असं कोणतंही बटण नसतं.
एकदा पैसे गेल्यावर बँक स्वतःहून पैसे परत करू शकत नाही. त्यासाठी समोरच्या व्यक्तीची परवानगी आवश्यक असते.
सर्वप्रथम त्या व्यक्तीला कॉल किंवा मेसेज करा. अनेकदा बोलल्यावर पैसे परत मिळू शकतात.
जर व्यक्तीने ऐकले नाही तर UPI ॲपमधील “Report Issue” वापरा आणि बँकेत तक्रार करा. Transaction ID आणि स्क्रीनशॉट्स तयार ठेवा.
BHIM ॲप किंवा NPCI पोर्टलवरही तक्रार करता येते. 30 दिवसात मदत न मिळाल्यास RBI लोकपालकडे तक्रार करता येते.
मोठे पैसे पाठवण्याआधी 1 रुपयाची टेस्ट करा आणि QR कोड वापरा. PIN टाकण्याआधी नाव नीट तपासल्यास नुकसान टाळता येते.
Tata electric car sales
esakal