Shubham Banubakode
चीनच्या इतिहासात वू झेटियन हे नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती होती. आजच्या हिशोबानुसार त्यांची संपत्ती जवळपास १६ ट्रिलियन डॉलर इतकी होती.
Historys Richest Woman
esakal
वू झेटियन यांचा जन्म ६२४ मध्ये चीनमध्ये झाला. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांना राजदरबारात स्थान मिळालं.
Historys Richest Woman
esakal
सुरुवातीला त्या सम्राट ताइझोंग यांच्या शाही उपपत्नी होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर नव्या सम्राट गाओझोंग यांनी त्यांना पुन्हा दरबारात बोलावलं.
Historys Richest Woman
esakal
सम्राटाच्या पत्नीशी आणि इतर प्रतिस्पर्ध्यांशी त्यांचा संघर्ष झाला. काही ऐतिहासिक नोंदींमध्ये विरोधकांना हटवण्यासाठी त्यांनी कठोर मार्ग वापरल्याचे उल्लेख आहेत.
Historys Richest Woman
esakal
इ.स. ६९० मध्ये वू झेटियन यांनी स्वतःला सम्राट घोषित केलं. स्वतःच्या नावाने चीनवर राज्य करणाऱ्या त्या एकमेव महिला सम्राट ठरल्या.
Historys Richest Woman
esakal
त्यांच्या संपत्तीचा आकडा अंदाजावर आधारित आहे. त्या काळातील शाही खजिना आणि वैयक्तिक संपत्ती यांची आजच्या पैशांत अचूक तुलना करणं कठीण आहे.
Historys Richest Woman
esakal
त्यांच्या कारकिर्दीत प्रशासन, शिक्षण आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न झाले. सिल्क रोडवरील व्यापारसंबंधांनाही त्यांच्या काळात महत्त्व होतं.
Historys Richest Woman
esakal
एका शाही उपपत्नीपासून सम्राट होण्यापर्यंतचा वू झेटियन यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची कारकीर्द आजही सत्ता, महत्त्वाकांक्षा आणि राजकारणासाठी चर्चिली जाते.
Historys Richest Woman
esakal
Indian Railways FTQ
esakal