कशामुळे एवढा महाग आहे श्याओमी 14? जाणून घ्या फीचर्स

Sudesh

श्याओमी

चिनी मोबाईल कंपनी श्याओमीने भारतात आपला Xiaomi 14 हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे.

Xiaomi 14 | eSakal

व्हेरियंट

या फोनचा एकच व्हेरियंट लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळतं.

Xiaomi 14 | eSakal

किंमत

या फोनची किंमत श्याओमीने तब्बल 69,999 रुपये एवढी ठेवली आहे.

Xiaomi 14 | eSakal

विक्री

11 मार्चपासून अमेझॉन इंडिया आणि श्याओमीच्या वेबसाईटवरुन तुम्ही हा फोन खरेदी करू शकाल.

Xiaomi 14 | eSakal

प्रोसेसर

यामध्ये क्लालकॉमचा लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 हा प्रोसेसर दिला आहे.

Xiaomi 14 | eSakal

स्क्रीन

या फोनमध्ये 6.36 इंच LTPO OLED डिस्प्ले मिळतो. यात कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन मिळतं. फोनच्या मागच्या बाजूलाही ग्लास देण्यात आली आहे.

Xiaomi 14 | eSakal

कॅमेरा

या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. यात 50MP प्रायमरी लेन्स, 50MP टेलिफोटो लेन्स आणि 50MP वाईड अँगल लेन्स मिळते. सेल्फीसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा आहे.

Xiaomi 14 | eSakal

चार्जिंग

या फोनमध्ये 4,610mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 90W वायर्ड आणि 50W वायरसेल चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये 10W रिवर्स वायरलेस चार्जिंग मिळते.

Xiaomi 14 | eSakal

रिअलमीने लाँच केले दोन नवे स्मार्टफोन; पाहा किंमत अन् फीचर्स

Realme 12 Plus 5G | eSakal